जिल्ह्यातील १२ ग्रामीण रुग्णालयांसह ४ उपजिल्हा रुग्णालयाच्या फायर ऑडिटचे होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:15 AM2021-01-14T04:15:35+5:302021-01-14T04:15:35+5:30
जिल्ह्यात असलेल्या ४ उपजिल्हा रूग्णालय आणि १२ ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतींचे फायर ऑडिट करण्याबाबत वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यात ...
जिल्ह्यात असलेल्या ४ उपजिल्हा रूग्णालय आणि १२ ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतींचे फायर ऑडिट करण्याबाबत वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यात १४ जानेवारी रोजी मुदखेड व उमरी ग्रामीण रूग्णालयाचे फायर ऑडिट केले जाईल. गोकुंदा व हदगाव उपजिल्हा रूग्णालय तसेच मांडवी आणि माहूर ग्रामीण रूग्णालयाचे १६ जानेवारी रोजी, हिमायतनगर, भोकर व बारड ग्रामीण रूग्णालयाचे १७ जानेवारी रोजी, धर्माबाद, बिलोली व नायगाव ग्रामीण रूग्णालयाचे १८ जानेवारी रोजी, लोहा व कंधार ग्रामीण रूग्णालयाचे १९ जानेवारी रोजी आणि मुखेड तसेच देगलूर उपजिल्हा रूग्णालयाचे २० जानेवारी रोजी फायर ऑडिट केले जाणार आहे. त्याचवेळी या रूग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अग्नीसुरक्षाबाबत प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
विहित वेळापत्रकानुसार फायर ऑडिट झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिले. प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील आग प्रतिबंधक उपाययोजना, विद्युत उपकरणांची सुरक्षीतता याबाबत सजग राहण्याबाबतही आदेशित केले आहे.