बापशेटवाडी येथे घरास आग, एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:27 AM2019-03-07T00:27:22+5:302019-03-07T00:27:36+5:30
बा-हाळीपासून जवळच असलेल्या मौजे बापशेटवाडी येथे ५ मार्च रोजी दुपारी एका शेतकऱ्याच्या घरास लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या वडिलांसह दोन जनावरे गंभीर भाजली असून एक म्हैस दगावली़ या आगीत संसारोपयोगी व शेतीतील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
बा-हाळी : बा-हाळीपासून जवळच असलेल्या मौजे बापशेटवाडी येथे ५ मार्च रोजी दुपारी एका शेतकऱ्याच्या घरास लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या वडिलांसह दोन जनावरे गंभीर भाजली असून एक म्हैस दगावली़ या आगीत संसारोपयोगी व शेतीतील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
मौजे बापशेटवाडी येथील शेतकरी बालाजी चंदर आल्लडवाड यांच्या घराला काल ५ रोजी दुपारी दोन वाजता अचानक आग लागली. दुपारची वेळ व कडाक्याचे ऊन असल्याने आगीने क्षणात रौद्र रूप धारण केले. दुपारची वेळ असल्याने बालाजी चंदर आल्लडवाड यांचे वडील चंदर हुलाजी आल्लडवाड (वय ९०) हे घरामध्ये झोपले होते़ हे काही जणांच्या लक्षात येताच एकच धांदल उडाली़ काही लोकांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांना बाहेर काढेपर्यंत ते गंभीर स्वरूपात भाजले होते़ त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ नांदेड येथे हलवण्यात आले़ या आगीत याच घरात बांधण्यात आलेली एक गाय व एक वगार गंभीर भाजले असून त्यांच्यावर बा-हाळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देवकते यांनी उपचार केला़ या आगीमध्ये एक म्हैस दगावली असून संसारोपयोगी व शेती अवजारसह सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले़ तलाठी ए़बी़ठाकूर व मंडळ अधिकारी डी.एस.यल्लावार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व सदर पंचनामा तहसील कार्यालयात दाखल केला़
उन्हाळ्याच्या दिवसांत शेतकºयाचा संसार उघड्यावर पडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शासनाने याची त्वरित दखल घेऊन योग्य ती मदत करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.