बिलोलीतील इको टूरिझमच्या क्षेत्राला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:46 AM2018-04-02T00:46:19+5:302018-04-02T00:46:19+5:30

येथील दत्त मंदिर टेकडीवर असलेल्या इको टूरिझम वनक्षेत्रातील तीन एकर परिसरात आग लागून झाडे-झुडुपे खाक झाली़ सदर आग लागण्याची घटना चार दिवसांपूर्वी झाल्याची माहिती येथून मिळाली़ दरम्यान, अज्ञात इसमाकडून हे कृत्य झाल्याची माहिती पुढे आली आहे़ सध्या येथे अजूनही पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे शोभिवंत झाडे, लॉन, फळबाग सुकून चालले आहेत़ वनतळे बांधण्यात आले; पण तेथे एक थेंबसुद्धा पाणी नाही़

Fire in the Biloise Echo Tourism area | बिलोलीतील इको टूरिझमच्या क्षेत्राला आग

बिलोलीतील इको टूरिझमच्या क्षेत्राला आग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बिलोली : येथील दत्त मंदिर टेकडीवर असलेल्या इको टूरिझम वनक्षेत्रातील तीन एकर परिसरात आग लागून झाडे-झुडुपे खाक झाली़ सदर आग लागण्याची घटना चार दिवसांपूर्वी झाल्याची माहिती येथून मिळाली़ दरम्यान, अज्ञात इसमाकडून हे कृत्य झाल्याची माहिती पुढे आली आहे़ सध्या येथे अजूनही पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे शोभिवंत झाडे, लॉन, फळबाग सुकून चालले आहेत़ वनतळे बांधण्यात आले; पण तेथे एक थेंबसुद्धा पाणी नाही़
बिलोली शहरातील दत्त मंदिर टेकडीवर वनविभागाची ६३ एकर जमीन आहे़ आॅक्टोबर २०१५ मध्ये राज्य शासनाने वन विभागाकडून या परिसराला इको टुरीझमचा दर्जा दिला़ २०१५ ते २०२० या पाच वर्षांत जवळपास ४ कोटी रुपयांचे प्रावधान ठेवले़ दरवर्षी टप्याटप्प्याने अनुदान वर्ग करून कामे करण्यात येत आहेत़ मागच्या दोन वर्षांत येथे बऱ्याच प्रमाणात विकासकामे झाली़ अंतर्गत रस्ते, वनतळे, लॉन, शोभीवंत झाडे, नागरिकांना बसण्यासाठी लोखंडी बेंच, ठिकठिकाणी डस्टबीन, व्यायामाचे साहित्य, आकर्षक स्वागत कमान, पर्यटक सोयीसुविधा, संपूर्ण ६३ एकरला लोखंडी संरक्षक कवच, मनोरा, झाडांना ओटे, सोलार दिवे, शौचालय आदींचे निर्माण झाले आहे़ ही सर्व कामे वन विभागाकडून अजूनही सुरू आहेत़
वनझाडे संरक्षण करणे हे महत्त्वाचे काम या विभागाकडे सोपविण्यात आले; पण पाण्याची सोय नसल्याने भयावह स्थिती निर्माण झाली आहे.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली झाडे आता वाळून जात आहेत़ यातच चार दिवसांपूर्वी अज्ञात इसमाकडून या भागात आग लावण्याचा प्रकार झाला़ आग कशामुळे लागली हे येथील कर्मचाºयांनाही माहीत नाही़ कडाक्याच्या उन्हामुळे वाळलेली झाडे व पालापाचोळा असा तीन एकरचा परिसर जळून खाक झाला़ पर्यटन परिसर असलेला भाग पूर्णपणे भकास दिसत आहे़ गेट, वॉचमन असतानाही हे कृत्य कोणी केले हे कळायला मार्ग नाही़ अजूनही येथे विकासकामे सुरू आहेत; पण जबाबदार अधिकाºयांचे नियंत्रण व देखरेख नसल्यामुळे इको टुरीझम परिसराची पुरती वाट लागली आहे़

आग विझवण्यासाठी वनरक्षक, पर्यटकांची धावपळ
आग विझवण्यासाठी वनरक्षकासह पर्यटकांनी धावपळ केली. दरम्यान, आग विझवताना वनसंरक्षक एल़ जी़ शिंदे हे कर्मचारी जखमी झाले व भाजल्या गेले़ २८ मार्चला दुपारी २ वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली व झपाट्याने पसरत गेली़ संपूर्ण परिसर व झाडे वाळलेली असल्याने आग वाढत गेली़ ज्यामध्ये पालापाचोळा व लहान-मोठी झाडे जळाली़ याबाबत वनसंरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंदविला असून तपास सुरू आहे.
- एम़एच़शेख, वनपाल, वनविभाग (फॉरेस्ट विभाग), बिलोली़

Web Title: Fire in the Biloise Echo Tourism area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.