बोथी येथे गोठ्यास आग लागून नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:34 AM2019-02-16T00:34:15+5:302019-02-16T00:34:47+5:30
उमरी : बोथी येथे शेतकऱ्याच्या गोठ्यास आग लागून वैरण शेती अवजारे यासह लाखोंचा ऐवज जळून खाक झाला असून यात ...
उमरी : बोथी येथे शेतकऱ्याच्या गोठ्यास आग लागून वैरण शेती अवजारे यासह लाखोंचा ऐवज जळून खाक झाला असून यात एक वासरूही ठार झाल्याची घटना घडली.
१५ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गावाला लागून असलेल्या गोठ्यास आग लागली. थोड्याच वेळात या आगीने रौद्ररूप धारण केले. या भीषण आगीत सोमनाथ बासरे, दिगांबर बासरे यांच्या गोठयातील जनावरांचा कडबा, गवत आणि शेतीची संपूर्ण अवजारे जळून खाक झाली. या आगीत एक वासरू होरपळून जागीच मृत्यू पावले. उमरी तालुक्यात अगोदरच दुष्काळाने शेतकºयांना हैराण करून सोडले आहे. हा भाग उंच माळरानावर असून या भागात जनावरांच्या चारा, गवताची टंचाई आहे. अशा वेळी या शेतकºयाचा संपूर्ण चारा जळून गेल्यामुळे जनावरांचे पालन पोषण कसे करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनातर्फे आग पीडित शेतकºयास त्वरित चारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे.