उमरीत फटाक्यांची आतषबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:19 AM2021-07-31T04:19:16+5:302021-07-31T04:19:16+5:30
रत्नाळी शाळेत वृक्षारोपण धर्माबाद - रत्नाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पंचायत ...
रत्नाळी शाळेत वृक्षारोपण
धर्माबाद - रत्नाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सभापती मारोती पाटील, पोलीस उपनिरीक्षक मारोती वाडेकर, सखाराम निलावार, अंकुश भोसले, गणेश गिरी, राजू शिरामने, जी.पी. मिसाळे, महेश जोशी, गंगाधर धडेकर, बाबूराव गोणारकर आदी उपस्थित होते.
जाधव यांना पुरस्कार
हिमायतनगर - तालुक्यातील कौठा (ज.) येथील लवकुश जाधव यांना महात्मा कबीर समता परिषदेचा बंजारा समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष किशन राठोड, डॉ. प्रमोद चव्हाण, ॲड. मुकुंदराज पाटील, लक्ष्मण फुलारी, लक्ष्मण मोरे, बालाजी पवार, रुपेश पाडमुख, गणेश पवार, ए. जी. राठोड, कुमार अभंगे, अंकुश जाधव, मंगेश देव आदी उपस्थित होते.
कार्याध्यक्षपदी मोहिते
माहूर - महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी माहूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराम मोहिते यांची निवड राज्याध्यक्ष राजू सोळंके यांनी केली. यावेळी सरचिटणीस विलास चव्हाण, गणपत मोहिते, नवनाथ मोहिते, प्रा. संजीवकुमार जाधव, संजय चव्हाण, नामदेवराव मोहिते, बाबू चव्हाण, ॲड. अनिता पवार, दत्ता मोहिते आदी उपस्थित होते.
मारतळा जि.प. शाळेस भेट
लोहा - सामाजिक कार्यकर्त्या आशा शिंदे यांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी मनोहर पाटील, केंद्रप्रमुख टी. पी. पाटील, प्रभारी मुख्याध्यापक देवबा होळकर, उपक्रमशील शिक्षक रवी ढगे, माधुरी मलदौडे, जयश्री वानोळे, ग्रामसेविका कविता पांचाळ आदी उपस्थित होते.
पवार यांना पारितोषिक
नायगाव - सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत ॲड. मुक्ताई पवार विजेत्या ठरल्या. त्यांना एका कार्यक्रमात पारितोषिक देण्यात आले. यावेळी राजेश सुरकुटलावार, कपिल जेटावार, रामदास पेंडकर आदींची उपस्थिती होती.
विवाहितेचा छळ
बिलोली - माचनूर येथील २६ वर्षीय विवाहितेचा छळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध कुंडलवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. सासरच्या लोकांनी कार घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ करून तिला उपाशीपोटी ठेवल्याचा आरोप आहे. जमादार चव्हाण तपास करीत आहेत.
दुचाकी लंपास
नायगाव - येथील उपकोषागार अधिकारी सुधीर कुलकर्णी यांची दुचाकी चोरट्यांनी २६ जुलैच्या रात्री लंपास केली. एम.एच.२३-आर.८८९० असा दुचाकीचा क्रमांक आहे. सकाळी दुचाकी न दिसल्याने कुलकर्णी यांनी शोध घेतला. मात्र ती न मिळाल्याने नायगाव पोलीस स्टेशन गाठून त्यांनी फिर्याद दिली.
अध्यक्षपदी लक्ष्मण येताळे
धर्माबाद - तालुक्यातील बाभळी (भ.) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते लक्ष्मण येताळे यांनी धर्माबाद तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाली. समितीचे अध्यक्ष दत्तात्रय अनंतवार यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. या निवडीचे अनेकांनी स्वागत केले.
बिलोलीत राष्ट्रीय लोकअदालत
बिलोली - जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड व बिलोली तालुका विधी सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑगस्ट रोजी बिलोली येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात येत आहे. यात बँक वसुलीची, ग्रामपंचायतीची प्रकरणे, कामगार, भूसंपादन तसेच दिवाणी प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.