नांदेडमध्ये गुरुद्वारा परिसरात गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:13 AM2018-12-24T00:13:07+5:302018-12-24T00:14:46+5:30

शहरातील गुुरुद्वारा प्रवेशद्वार क्रमांक ५ समोर धूम्रपान करणाऱ्या तिघांना काही तरुणांनी हटकल्यानंतर त्यांनी स्वत:जवळील पिस्तुलातून दोन गोळ्या हवेत झाडल्या़ घटनेनंतर आरोपी कारने पसार झाले

Firing in Gurudwara area in Nanded | नांदेडमध्ये गुरुद्वारा परिसरात गोळीबार

नांदेडमध्ये गुरुद्वारा परिसरात गोळीबार

googlenewsNext

नांदेड : शहरातील गुुरुद्वारा प्रवेशद्वार क्रमांक ५ समोर धूम्रपान करणाऱ्या तिघांना काही तरुणांनी हटकल्यानंतर त्यांनी स्वत:जवळील पिस्तुलातून दोन गोळ्या हवेत झाडल्या़ घटनेनंतर आरोपी कारने पसार झाले असून पोलिसांनी त्यांचा भोकर फाट्यापर्यंत पाठलाग केला़ परंतु, ते हाती लागले नाहीत़ ही घटना शनिवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली़
गुुरद्वारा प्रवेशद्वार क्रमांक ५ समोर तेजिंदरसिंघ मोहनसिंघ, मोनूसिंघ गाडीवाले, राजिंदरसिंघ व गुरुप्रितसिंघ कारपेंटर हे चार तरुण थांबले होते़ त्यांच्यापासून थोड्याच अंतरावर एका कारच्या शेजारी अन्य तीन अनोळखी तरुण उभे होते़ हे तरुण कारजवळ उभे राहून सिगारेट ओढत होते़ त्याचवेळी चार जणांनी त्यांना गुरुद्वारा परिसरात धूम्रपान करण्यास मनाई असल्याचे सांगितले़ तोच तिघांपैकी एकाने आपल्याजवळील बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या़ सुदैवाने या दोन्ही गोळ्या कुणालाही लागल्या नाहीत़ त्यानंतर चार तरुणांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली़
आवाजामुळे परिसरातील नागरिक घराबाहेर आले़ त्यामुळे घाबरलेल्या तिघांनी कारसह पलायन केले़ घटनेची माहिती पोलिसांना मिळताच लगेच शहरात नाकाबंदी करण्यात आली़ त्याचबरोबर इतवारा, भाग्यनगर, शिवाजीनगर, गुरुद्वारा सुरक्षापथकाच्या कर्मचाºयांनी कारचा पाठलाग केला़ भोकर फाट्यापर्यंत हा पाठलाग सुरु होता़
परंतु आरोपी गुंगारा देवून पळून जाण्यात यशस्वी झाले़ पोलिसांकडून आता या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे़ आरोपीकडे असलेली गाडी ही हरियाणा पासिंगची असल्याची माहिती हाती आली आहे़ दरम्यान, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, उपअधीक्षक अभिजित फस्के, पोनि़सुनील निकाळजे, पोनि़ संदीप शिवले यांनी भेट दिली़

Web Title: Firing in Gurudwara area in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.