Biyani Murder Case पतीची सुपारी देणाऱ्या हुकमी एक्क्याला आधी पकडा, बियाणींच्या पत्नीचा न्यायासाठी टाहो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 11:24 AM2022-04-06T11:24:13+5:302022-04-06T11:25:15+5:30

Biyani Murder Case Nanded: कुटुंबीय आणि नातेवाईकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

first arrest my husband's murderer, late Sanjay Biyani's wife seeking for justice | Biyani Murder Case पतीची सुपारी देणाऱ्या हुकमी एक्क्याला आधी पकडा, बियाणींच्या पत्नीचा न्यायासाठी टाहो

Biyani Murder Case पतीची सुपारी देणाऱ्या हुकमी एक्क्याला आधी पकडा, बियाणींच्या पत्नीचा न्यायासाठी टाहो

googlenewsNext

नांदेड: पतीच्या हत्येनंतर संजय बियाणी (Biyani Murder Case Nanded) यांच्या पत्नीने न्याय देण्याच्या मागणीसाठी टाहो फोडला आहे. बियाणी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या नांदेडच्या घरी ठेवण्यात आले आहे. 

मंगळवारी सकाळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची अज्ञात दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. घटनेच्या निषेधार्थ बुधवारी व्यापारी संघटनांनी नांदेड बंद पुकारला आहे. बियाणी यांचे पार्थिव त्यांच्या घरी ठेवण्यात आले आहे.

यावेळी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा अशी कुटुंबासह त्यांच्या मित्रमंडळींनी मागणी केलीय. यावेळी मृत संजय बियाणी यांच्या पत्नीने आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या झाल्याचा आरोप केला असून गुन्हेगारांना अटक करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आधी हुक्कुमचा एक्का पकडा, नंतर प्यादे 
पोलीस प्रशासन कुठे आहे, जिल्हाप्रशासन काय करत आहे, नांदेडमध्ये दिवसाढवळ्या खून होतात. अशा प्रकारे खून झालेले माझे पती शहरातील आठवे आहेत. पोलीस प्रशासन नाही ते प्रश्न विचारात आहेत. समाजाच्या, नांदेडच्या प्रत्येक गरिबाला माझ्या पतीने आधार दिला. मला न्याय द्या. आधी सुपारी देणाऱ्या हुक्कुमाच्या एक्क्याला आधी पकडा, नंतर मारणारे प्यादे. न्यायासाठी मुंबई, दिल्लीपर्यंत जाणार 
- मृत संजय बियाणी यांच्या पत्नी

Web Title: first arrest my husband's murderer, late Sanjay Biyani's wife seeking for justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.