अटलबिहारी वाजपेयींचा पक्षवाढीसाठी १९८२ मध्ये पहिला नांदेड दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:51 AM2018-08-17T00:51:14+5:302018-08-17T00:52:01+5:30

भाजपा स्थापनेचा दोन वर्षानंतर पक्ष वाढीसाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नांदेडमध्ये १९८२ मध्ये पहिली जाहीर सभा घेतली होती. पक्ष कार्यासाठी तत्कालीन भाजपा पदाधिकाऱ्यांनी तीन लाखांची थैलीही वाजपेयी यांना भेट दिली होती. भाजपाची स्थापना १९८० मध्ये झाल्यानंतर पक्षवाढीसाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी देशभर दौरे काढले होते.

First Nanded Tour in 1982 for Atal Bihari Vajpayee's Advancement | अटलबिहारी वाजपेयींचा पक्षवाढीसाठी १९८२ मध्ये पहिला नांदेड दौरा

अटलबिहारी वाजपेयींचा पक्षवाढीसाठी १९८२ मध्ये पहिला नांदेड दौरा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : भाजपा स्थापनेचा दोन वर्षानंतर पक्ष वाढीसाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नांदेडमध्ये १९८२ मध्ये पहिली जाहीर सभा घेतली होती. पक्ष कार्यासाठी तत्कालीन भाजपा पदाधिकाऱ्यांनी तीन लाखांची थैलीही वाजपेयी यांना भेट दिली होती.
भाजपाची स्थापना १९८० मध्ये झाल्यानंतर पक्षवाढीसाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी देशभर दौरे काढले होते. याच दौ-याअंतर्गत नांदेडमध्ये १९८२ मध्ये ते पहिल्यांदा आले होते. पक्षवाढीचे उद्दिष्ट्य ठेवून त्यांनी चिखलवाडी येथील उदासी मठ मैदानावर जाहीर सभाही घेतली. या सभेत तत्कालीन भाजपा पदाधिका-यांनी वाजपेयी यांना पक्ष कार्यासाठी तीन लाखांची आर्थिक मदतही केली होती. यामध्ये तत्कालीन आ. चंद्रकांत मस्की, गणपतराव राऊत आदींचा समावेश होता. पक्षवाढीसाठी त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र येत निष्ठेने काम करण्याचा सल्ला दिला होता.
सभेनंतर भाग्यनगर येथील डॉ. प्रभाकर पुरंदरे यांच्या निवासस्थांनी त्यांनी भोजन घेतले होते. डॉ. प्रभाकर पुरंदरे हे संघाचे कार्यकर्ते. त्यांचेही शिक्षणही लखनऊ येथे झाले होते. वाजपेयी यांचेही शिक्षण तेथेच झाल्याने त्या परिचयातून त्यांनी पुरंदरे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. यावेळी वेदप्रकाश गोयल यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मंजिरी पुरंदरे, अरुंधती पुरंदरे यांनी आदरातिथ्य केले होते. १९९६ आणि १९९८ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी प्रचार केला होता. भाजपाचे उमेदवार धनाजीराव देशमुख यांच्या प्रचारासाठी त्यांनी नांदेडमध्ये सभा घेतल्या. यावेळी त्यांच्यासमवेत प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान एका आंदोलनासंदर्भात अटलबिहारी वाजपेयी यांचे वाजेगाव येथेही एक सभा झाली होती. प्रशासनाने शहरात वाजपेयी यांच्या सभेला परवानागी न दिल्याने ही सभा वाजेगावमध्ये घेण्यात आली होती. या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. वाजपेयी यांच्या सभेला परवानगी नाकारण्याचा नांदेडला इतिहास आहे.
---
लखनऊच्या आठवणीत रमले अटलबिहारी
१९८२ मध्ये नांदेडला पक्षाच्या प्रचार प्रसारासाठी आलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी दुपारचे जेवन भाग्यनगर येथील डॉ. प्रभाकर पुरंदरे यांच्या घरी घेतले. जेवनानंतर तेथेच सुमारे तासभर गप्पांचा फड रंगला. डॉ. पुरंदरे यांचे वैद्यकीय शिक्षण लखनऊ येथे झाले होते तर अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर पाचजन्य या साप्ताहिकांची जबाबदारी संघटनेने टाकलेली असल्याने त्यांचे लखनऊला येणे-जाणे होते. त्यामुळेच लखनऊ शहराविषयीच्या विविध आठवणी त्यांनी सांगितल्या. १९८२ मध्ये अटलबिहारी वाजपेयी नांदेडला आले, त्यापूर्वी दोन-तीन दिवस अगोदरच मध्यप्रदेश येथे त्यांच्या सभेवर दगडफेक झालेली होती. त्यामुळे
सायंकाळी चिखलवाडी येथे झालेल्या जाहीर सभेत वाजपेयी यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले यांच्यावर जोरदार टीका केली.

 

Web Title: First Nanded Tour in 1982 for Atal Bihari Vajpayee's Advancement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.