पहिल्याच पावसात कौठा-हळदा रस्ता चार तास बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:52 AM2019-06-23T00:52:40+5:302019-06-23T00:54:12+5:30
राष्ट्रीय महामार्ग उस्मानगर-कौठा रस्त्याचे काम मागील ६ महिन्यांपासून सुरुवात झाले़ मात्र गुत्तेदार व अधिकाऱ्यांचे कामाकडे लक्ष नसल्याने काम कासवगतीने सुरु आहे़
नांदेड/कौठा : राष्ट्रीय महामार्ग उस्मानगर-कौठा रस्त्याचे काम मागील ६ महिन्यांपासून सुरुवात झाले़ मात्र गुत्तेदार व अधिकाऱ्यांचे कामाकडे लक्ष नसल्याने काम कासवगतीने सुरु आहे़
जिल्ह्यात शुक्रवारी रात्री पाऊस सुरू झाला. कौठा परिसरात २२ जून रोजी सकाळच्या सुमारास वादळी वा-यासह पावसाला सुरुवात होताच वळणरस्त्यावर मुरुम न टाकल्याने ४ तास वाहतूक ठप्प झाली होती़ महामंडळाच्या बिलोली-कंधार, कंधार-नरसी, नांदेड-मुखेड, नांदेड-टेंभुर्णी बसेस जागेवरच थांबल्या़ सकाळी कर्मचारी, विद्यार्थी शाळा व कार्यालयात जाणाऱ्यांचे हाल झाले़ चिखलामुळे दुचाकीस्वारांना जागेवरच गाड्या थांबवाव्या लागल्या़ सदरील प्रकार ठेकेदाराला सांगितल्यानंतर रस्त्यावर मुरुम टाकून वाहतूक सुरळीत करण्यात आली़ रस्त्याचे काम वेगाने करण्याची मागणी वाहनधारकांसह प्रवाशांतून होत आहे़ अन्यथा कौठा-नांदेड-कौठा-मुखेड वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे़
दरम्यान, बहाद्दरपुरा येथेही शुक्रवारी रात्री पाऊस झाला. सावरगाव माळ येथेही पावसानंतर शेतकरी शेतीकामात गुंतला. भोकर तालुक्यात शुक्रवारी रात्री भोकर, किनी सर्कलमध्ये रिमझिम पाऊस झाला. पेरणीसाठी अद्यापही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.