धर्माबाद व्यापारी असोसिएशन पहिल्यांदाच बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 01:06 AM2018-10-15T01:06:36+5:302018-10-15T01:07:06+5:30

धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून धर्माबाद व्यापारी असोसिएशन बरखास्त करण्यात आली आहे़ आजपर्यंतच्या इतिहासात राजकारणामुळे गट निर्माण होऊन व्यापारी असोसिएशन बरखास्त झाली असली तरीही असोसिएशन पुन्हा नव्याने होणे गरजेचे आहे, अशी व्यापााऱ्यांत चर्चा होत आहे.

For the first time dismissed Dharmabad Traders Association | धर्माबाद व्यापारी असोसिएशन पहिल्यांदाच बरखास्त

धर्माबाद व्यापारी असोसिएशन पहिल्यांदाच बरखास्त

Next
ठळक मुद्देव्यापारी संघात दोन जागांसाठी निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
धर्माबाद : धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून धर्माबाद व्यापारी असोसिएशन बरखास्त करण्यात आली आहे़ आजपर्यंतच्या इतिहासात राजकारणामुळे गट निर्माण होऊन व्यापारी असोसिएशन बरखास्त झाली असली तरीही असोसिएशन पुन्हा नव्याने होणे गरजेचे आहे, अशी व्यापााऱ्यांत चर्चा होत आहे.
व्यापारी संघात दोन जागांसाठी निवडणूक होत असल्याने, व्यापारी असोसिएशनमधून दोन उमेदवार बिनविरोध काढण्याचा निर्णय, व्यापारी असोसिएशनमध्ये पहिल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत १६५ व्यापारी उपस्थित होते. यात सहा व्यापारी इच्छुक होते. पुढे होणा-या बैठकीत सहापैकी दोन जणांची निवड सर्वानुमते मतानुसार होणार होती अशी माहिती मिळते. पुढे होणा-या बैठकीपूर्वीच राजकारण घुसले व व्यापा-यांत फूट पडली.
व्यापारी असोसिएशनचे सचिव महेंद्रपांडे व कोषाध्यक्ष प्रकाश गुजराथी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर व्यापाºयांत आणखी खळबळ उडाली. व्यापा-यात असलेली चर्चा बाहेर पडल्याने त्यांची बदनामी होऊ नये म्हणून व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुबोध काकाणी यांनी व्यापारी असोसिएशनची बॉडी बरखास्त केली. व्यापारी असोसिएशन अध्यक्ष सुबोध काकाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यापारी असोसिएशन बरखास्त झाली असल्याचे जाहीर केले आहे. ते म्हणाले, प्रतिष्ठित व्यापाºयांच्या अतिमहत्वाकांक्षेने धर्माबाद व्यापारी असोसिएशन बरखास्त झाली आहे.
बैठकीस दोन्ही व्यापा-यांची अनुपस्थिती
९ आॅक्टोबर रोजी गंगाधर गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली व नागनाथ बुट्टे पाटील, नरसिंगदास बजाज यांच्या प्रमुख उपस्थितीत बोलावण्यात आलेल्या बैठकीत या दोन्ही व्यापा-यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे सर्व व्यापा-यांनी सदरील व्यापा-यांना त्यांच्या केलेल्या कृत्याबद्दल जाब विचारता आला नाही. व्यापाºयांनी त्यांना भ्रमणध्वणीवरुन संपर्क साधले असता कोणतेही उत्तर मिळाले नाही. बैठकीत सर्व व्यापा-यांनी त्यांच्या या कृत्यावर नाराज होऊन निषेध केला़ तसेच असोसिएशन बरखास्त करण्याची मागणी केली़

Web Title: For the first time dismissed Dharmabad Traders Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.