प्रथमच झरी तलावात होणार श्रींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:19 AM2021-09-19T04:19:27+5:302021-09-19T04:19:27+5:30
शहरात १६ श्री मूर्तींचे संकलन केंद्र, स्थापन करण्यात आले आहेत. त्यामध्ये तरोडा, सांगवी भागासाठी चक्रधरनगर, विठ्ठल रुकमाई मंदिर परिसर, ...
शहरात १६ श्री मूर्तींचे संकलन केंद्र, स्थापन करण्यात आले आहेत. त्यामध्ये तरोडा, सांगवी भागासाठी चक्रधरनगर, विठ्ठल रुकमाई मंदिर परिसर, चैतन्यनगर साईबाबा मंदिर परिसर, महाकाली मंदिर देवी परिसर, अष्टविनायक गणपती मंदिर, वर्कशॉप पाण्याची टाकी, महाराणा प्रतापसिंह चौक, स्वामी समर्थ मंदिर मगनपुरा, सन्मित्र कॉलनी हनुमान मंदिर परिसर, बजाजनगर हनुमान मंदिर परिसर, विजयनगर हनुमान मंदिर परिसर, पावडेवाडी नाका, आयटीआय कॉर्नर, कोठारी कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर, जुनामोंढा येथील शेरे पंजाब महाराज रणजितसिंघ मार्केट जुनामोंढा टॉवर आणि मनपा क्षेत्रीय कार्यालय सिडको येथे श्री मूर्तींचे संकलन महापालिकेच्यावतीने केले जाणार आहे. हे संकलन केल्यानंतर १२ वाहनांतून पासदगाव येथील कृत्रिम तलावात विसर्जन केले जाईल. निर्माल्य संकलनासाठी १६ वाहनेही शहरात राहणार आहेत, असे मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सांगितले.