नांदेड जिल्हा प्रशासनाचा टंचाई उपाययोजनांवर पाच कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:24 AM2018-05-11T00:24:15+5:302018-05-11T00:24:15+5:30

उन्हाच्या तीव्रतेबरोबर पाणीटंचाईनेही गावे होरपळून निघत आहेत. टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून कुपनलिका, विहीर दुरुस्तीसह पूरक नळ योजनांसाठी एप्रिलअखेरपर्यंत ४ कोटी ९४ लाख १३ हजार इतका निधी खर्च झाला आहे.

Five crore expenditure for the Nanded district administration's scarcity measures | नांदेड जिल्हा प्रशासनाचा टंचाई उपाययोजनांवर पाच कोटींचा खर्च

नांदेड जिल्हा प्रशासनाचा टंचाई उपाययोजनांवर पाच कोटींचा खर्च

googlenewsNext
ठळक मुद्दे४३५ विहिरी घेतल्या : दुरूस्तीची कामेही प्रगतीपथावर

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : उन्हाच्या तीव्रतेबरोबर पाणीटंचाईनेही गावे होरपळून निघत आहेत. टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून कुपनलिका, विहीर दुरुस्तीसह पूरक नळ योजनांसाठी एप्रिलअखेरपर्यंत ४ कोटी ९४ लाख १३ हजार इतका निधी खर्च झाला आहे.
ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र होत आहे. या बरोबरच टँकर आणि अधिग्रहणाची मागणीही वाढत आहे. या पार्श्वभूमिवर प्रशासनाने आवश्यकतेनुसार टँकर पुरविण्यास सुरुवात केली असून विविध जलस्त्रोतांचे अधिग्रहणही करण्यात येत आहे. दरम्यान, या बरोबरच जिल्ह्यातील विविध भागांत विंधन विहिरी, कुपनलिका घेणे, पाणीपुरवठा योजनांची तसेच विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरत्या पूरक नळयोजना घेणे, टँकर तसेच बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, विहिरीतील गाळ काढणे आदी उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात ४ हजार ५३ प्रस्तावित उपाययोजनांची संख्या असून यासाठी प्रस्तावित गावे १२४२ इतकी आहेत. तर ५७६ वाड्यांचाही यात समावेश असून यासाठी ४ हजार ७४६.५७ इतका खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, प्रशासनाने २ हजार २११ गावे आणि २७४ वाड्यांसाठी २ हजार ९२८ उपाययोजनांना मंजुरी दिली असून यासाठी २०३०.७४ लाख इतका खर्च येणार आहे. यातील ११४६ गावे आणि २३२ वाड्यांवर १७९६ उपाययोजनांची कामे प्रगतीपथावर असून ९३८.४२ इतका खर्च करण्यात येत आहे. दरम्यान, १५९० उपाययोजनांची कामे प्रशासनातर्फे पूर्ण करण्यात आली असून यासाठी ४९४.१३ लाख इतका खर्च केल्याचे जि.प. पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले़

बिलोली : २२ तात्पुरत्या नळयोजना
पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा ग्रामीण पाणीटंचाई कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात १५८ तात्पुरत्या पूरक नळयोजना प्रस्तावित असून यातील १६० योजनांचे सर्वेक्षणही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यातील १४० योजना कामासाठी पात्र ठरल्या आहेत. पात्र योजनांपैकी १३८ योजनांस प्रपत्र (ब) प्राप्त झाले असून ३ मेपर्यंत १३० योजनांची अंदाजपत्रकेही सादर करण्यात आली आहेत. यातील १०६ योजनांच्या अंदाजपत्रकांना मंजुरी देण्यात आली आहे. यात बिलोली तालुक्यातील सर्वाधिक २२ योजनांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ मुखेड १५, कंधार आणि लोहा प्रत्येकी १४, अर्धापूर ७, देगलूर १०, हदगाव ४, किनवट ६, हिमायतनगर आणि नांदेड ३ तर माहूर तालुक्यातील २ योजनांची अंदाजपत्रके मंजूर आहेत.

नवीन विंधन विहिरी घेण्याचा उपक्रम जिल्हा ग्रामीण पाणीटंचाई कार्यक्रमातंर्गत सुरु आहे. प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील १६ तालुक्यांत ९५७ विंधन विहिरी प्रस्तावित असून यातील ८७९ विहिरींना प्रशासनाने मंजूरी दिली आहे. मंजुरी दिली आहे. यापैकी ८७९ विहिरींचे काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मागील दोन महिन्यांत प्रशासनाच्या वतीने ४३५ विंधन विहिरींपैकी ३६५ विहिरींना पाणी लागले असून ५९ कोरड्या निघाल्या. दरम्यान, यशस्वी ३६५ पैकी ४० विंधन विहिरींवर हातपंप बसविण्यात आल्याने टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Five crore expenditure for the Nanded district administration's scarcity measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.