सुखी संसाराच्या स्वप्नांचा चुराडा; ऑटो-ट्रकच्या अपघातात नववधुचा मृत्यू, नवरदेव गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 08:41 PM2022-02-21T20:41:08+5:302022-02-21T20:52:22+5:30

परतणीसाठी जाणाऱ्या नववधूचा अपघाती मृत्यू; भोकर-किनवट रस्त्यावर झालेल्या अपघातात सहा जण गंभीर जखमी

five died and six injured after truck ape auto collision in nanded | सुखी संसाराच्या स्वप्नांचा चुराडा; ऑटो-ट्रकच्या अपघातात नववधुचा मृत्यू, नवरदेव गंभीर जखमी

सुखी संसाराच्या स्वप्नांचा चुराडा; ऑटो-ट्रकच्या अपघातात नववधुचा मृत्यू, नवरदेव गंभीर जखमी

googlenewsNext

भोकर  (जि.नांदेड) : भोकर ते किनवट रस्त्यावरील सोमठाणा पाटी जवळ असलेल्या एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या ॲपे ऑटो (क्र.एम.एच.२९-ए.आर.३२२९) आणि ट्रकचा (क्र.एम.एच.०४-ए.एल.९९५५) भीषण अपघात २१ रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान झाला. अपघात पाच जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृत्यूमध्ये परतीने जाणारे नववधूचा समावेश आहे. तर नवरदेव जखमी झाला आहे.

जारीकोट ता. धर्माबाद येथील नवरदेव नागेश साहेबराव कन्नेवाड यांचे साखरा ता. उमरखेड येथील पूजा तामलवाड यांच्याशी साखरा ता. उमरखेड येथे १९ फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. त्यानंतर आज २१ रोजी मांडव परतणीसाठी जारीकोट येथून साखरा येथे भोकरमार्गे मॅजिक वाहनाने जाताना भोकर तालुक्यातील सोमठाणा पाटीजवळ सायंकाळी ६ वाजता समोरुन येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात नवरी पुजा ज्ञानेश्वर पामलवाड (वय २० वर्ष, रा. साखरा ता. उमरखेड), माधव पुरभाजी सोपेवाड (वय ३०, रा. जामगाव ता. उमरी), दत्ता ज्ञानेश्वर पामलवाड (वय २२ रा. साखरा), सुनील दिगंबर थोटे (वय ३० रा. चालगणी ता. उमरखेड) यांच्यासह अन्य एक (नाव समजु शकले नाही) अशा एकूण ५ जणांचा मृत्यू झाला. गंभीर जखमीमध्ये नवरदेव नागेश साहेबराव कन्नेवाड यांच्यासह सुनीता अविनाश टोकलवार (वय ४० वर्ष, रा उमरी जहागीर, ता. हदगाव), गौरी माधव चोपलवाड (वय दीड वर्ष रा. उमरी जहागीर ता. हदगाव ) अविनाश संतोष टोकलवार (वय ३६ वर्षे, रा. उमरी जहागीर, ता. हदगाव), अभिनंदन मधुकर कसबे (वय १२ रा.वाजेगाव) यांच्यासह ६ जणांचा समावेश आहे.

Web Title: five died and six injured after truck ape auto collision in nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.