बाभळी धरणाचे पाच दरवाजे उघडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:26 AM2018-06-12T00:26:10+5:302018-06-12T00:26:10+5:30
जूनमध्येच आगमन झालेल्या पावसाने नांदेड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. गेल्या तीन दिवसांपासून बाभळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने सोमवारी दुपारी धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील नांदेड, भोकर, मुदखेड, उमरी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड/धर्माबाद : जूनमध्येच आगमन झालेल्या पावसाने नांदेड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. गेल्या तीन दिवसांपासून बाभळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने सोमवारी दुपारी धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील नांदेड, भोकर, मुदखेड, उमरी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४९.६७ मि.मी. पावसाची नोंद झाली. बाभळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे धरण काठोकाठ भरले आहे. तसेच धरणात येणाऱ्या पाण्याचा ओेघ कायम आहे. त्यामुळे धोका लक्षात घेऊन पाटबंधारे खात्याने सोमवारी दुपारी धरणाचे पाच दरवाजे उघडले़ हे पाणी पुढे निजामाबाद जिल्ह्यातील पोचमपाड प्रकल्पात पोहोचले आहे.
गेल्या २४ तासांत नांदेड तालुक्यात ७५.६३ मि.मी, मुदखेड ८२.६७ मि.मी, भोकर: ९२.७५ मि.मी तर उमरी तालुक्यात ६९.६९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्याच्या इतर तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. अर्धापूर ५८.६७, कंधार ४२.३३, लोहा ५७, किनवट २२़७१, माहूर २८, हदगाव ३५़५७, हिमायतनगर ३९़३३, देगलूर १५़५०, बिलोली ४६़२०, धर्माबाद ५७, नायगाव ५०़८० आणि मुदखेड तालुक्यात २०़८६ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात १७१़ २० मि़मी़ पावसाची नोंद झाली़ दरम्यान, रविवारी झालेल्या अतिवृष्टीने भोकर तालुक्यातील हाडोळी, पोमनाळा, कोळगाव खु. येथे घरांची पडझड झाली. भोसी परिसरात ताटकळवाडी शिवारात केळीचे नुकसान झाले़ अतिवृष्टीमुळे धारजनी येथे घराची भिंत पडून १२ वर्षाचा बालक दगावला तसेच अनेक घराची पडझड झाली आणि वीज पडून गाय दगावली आहे.
परभणीत चौथ्या दिवशीही हजेरी
च्परभणी : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, रविवारी रात्रीही सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे़ पावसामुळे पेरणीच्या कामांनाही वेग आला आहे.
हिंगोलीत सरासरीच्या १६ टक्के पर्जन्य
च्हिंगोली : यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यातच पाऊस झाला. त्यामुळे सरासरीच्या १५.९९ टक्के पावसाची नोंद झाली असून, गतवर्षी याच कालावधीत अवघा ७.६५ टक्के पाऊस झाला होता. यंदा हिंगोली १४.८३ टक्के, वसमत-१८.९३, कळमनुरी १८.२८, औंढा नागनाथ-१३.९९, सेनगाव-१३.३३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.