नांदेडमध्ये किराणा दुकानातून पाच लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 07:35 PM2021-03-12T19:35:03+5:302021-03-12T19:35:19+5:30
अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांच्या नेतृत्वाखाली जुना गंज येथील मे.गोल्डन किराणा दुकानावर धाड टाकली.
नांदेड : शहरातील जुना गंज भागात अन्न व औषधी प्रशासनाने एका किराणा दुकानावर धाड मारून ४ लाख ७८ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांच्या नेतृत्वाखाली जुना गंज येथील मे.गोल्डन किराणा दुकानावर धाड टाकली. यावेळी दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या २८ कंपन्यांचा ४ लाख ७८ हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख खयूम शेख इब्राहिम याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात गुटख्याची सर्रासपणे विक्री करण्यात येत आहे. प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. मात्र, त्यानंतरही गुटखा विक्रीला पायबंद घालण्यात आला नाही. याआधी सिडको येथील ढवळे कॉर्नर परिसरात एका पानटपरीवर ९ मार्च राेजी अन्न व औषध प्रशासनाने धाड मारली होती.