सात लाखांच्या लूट प्रकरणात ५ संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:22 AM2021-08-13T04:22:40+5:302021-08-13T04:22:40+5:30
बुधवारीच रात्री साडेनऊच्या सुमारास श्रीनगर येथील पंचशील ड्रेसेस समोर भाजपा युवा मोर्चाचा माजी जिल्हाध्यक्ष सोनू कल्याणकर यांच्या तीन गोळ्या ...
बुधवारीच रात्री साडेनऊच्या सुमारास श्रीनगर येथील पंचशील ड्रेसेस समोर भाजपा युवा मोर्चाचा माजी जिल्हाध्यक्ष सोनू कल्याणकर यांच्या तीन गोळ्या अज्ञात आरोपींनी झाडल्या. सुदैवाने एकही गोळी त्यांना लागली नसली तरी या घटनेने श्रीनगर भागात खळबळ उडाली. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेत प्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजूंनी तपास सुरू केला आहे. कल्याणकर यांच्या विरोधात ही गंभीर गुन्हे दाखल आहे. अंतर्गत वादातून हा प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. परंतु गोळीबाराचे ठोस कारण अद्यापही पुढे आले नाही. गोळीबार झाला की घडवून आणला या दिशेनेही पोलीस तपास करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरूवारी सायंकाळपर्यंत तरी सीसीटीव्हीत कैद झालेल्या आरोपी निष्पन्न झाले नव्हते. अप्पर पोलीस अधीक्षक निलेश माने, विजय कबाडे यांनीही या प्रकरणात बुधवारी रात्री उशिरापर्यंत भाग्यनगर ठाण्यात घटनेप्रकरणी चौकशी केली.
एकूणच शहरातील गुन्हेगारी घडामोडींमुळे सामान्य नागरिक मात्र भयभीत झाला आहे.