बिलोली येथे पाच हजार ब्रास अवैध वाळू साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 07:00 PM2018-03-09T19:00:42+5:302018-03-09T19:02:50+5:30
बिलोली तालुक्यातील हरणाळा व राहेर येथील अनेक अवैध वाळू साठ्यावर महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने धाड टाकली.
नांदेड : बिलोली तालुक्यातील हरणाळा व राहेर येथील अनेक अवैध वाळू साठ्यावर महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने धाड टाकली. गोदावरी पात्रातील साठवलेला हजारो ब्रास वाळू साठा यावेळी जप्त करण्यात आला.
बिलोली येथील गोदावरी पात्रातील वाळूची सर्वत्र मागणी आहे. या वाळूचा हरणाळा व राहेर येथील अनेक शेतात अवैधरित्या वाळूसाठा करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार विनोद गुंडमवार यांना मिळाली होती. यावरून आज सकाळी महसुल व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त कारवाई करत या अवैध वाळूसाठ्यावर पथकासह धाड टाकली. यात पाच ते सात हजार ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. यासोबतच या भागातील इतर शेतात आणखी वाळूसाठा अवैधरीत्या असल्याचा शोध पथकाकडून घेण्यात येत आहे. या कारवाईत डॉ. ओमप्रकाश गौंड, उपअभियंता सुरेंद्र गवारे यांच्यासह पथकातील इतर कर्मचारी सहभागी होते.