मुदतवाढीचे आदेश पोहोचले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:14 AM2017-08-02T00:14:19+5:302017-08-02T00:14:19+5:30

Fixed-order orders were not reached | मुदतवाढीचे आदेश पोहोचले नाहीत

मुदतवाढीचे आदेश पोहोचले नाहीत

Next
ठळक मुद्दे एकाही बँकेने पीक विम्याचे अर्ज स्वीकारले नाहीत़

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: पंतप्रधान पीक विमा योजनेत शासनाने ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीची घोषणा केली, परंतु मंगळवारी दिवसभर बँकांना त्याबाबत आदेशच मिळाले नव्हते़ त्यामुळे दिवसभरात एकाही बँकेने पीक विम्याचे अर्ज स्वीकारले नाहीत़ त्यामुळे शेतकºयांना आल्यापावली परत जावे लागले. मुदतवाढीचा पहिला दिवस निरंक गेला़
पंतप्रधान पीक विमा योजनेत ३१ जुलै या अंतिम तारखेपर्यंत जिल्ह्यातील जवळपास चार लाख शेतकºयांनी बँकेच्या रांगेत धक्के खात पीक विमा भरला होता, परंतु अद्यापही जिल्ह्यात ३ लाख ७० हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली होती़ राज्यभरात अशीच अवस्था होती़ त्यात शासनाने पीक विमा स्वीकारण्यास ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीची घोषणा केली़ परंतु मंगळवारी दिवसभर बँकांना त्याबाबतचे आदेशच मिळाले नसल्यामुळे मुदतवाढीचा आजचा पहिला दिवस वाया गेला़
गतवर्षी पीक विमा योजनेसाठी खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख ६७ हजार ९७३ शेतकºयांनी अर्ज केले होते़ त्यांना राज्यभरात उच्चांकी ५०२ कोटींची नुकसान भरपाईही मिळाली होती़ खरिप हंगामात या शेतकºयांनी पीक विमा कंपनीकडे ३० कोटी ४० लाखांचा हप्ता भरला होता़ त्यामुळे नुकसान भरपाईपोटी ४ लाख ४४ हजार ७४ शेतकºयांना त्याचा लाभ मिळाला होता़
विशेष म्हणजे, २०१६ मध्ये खरिपाची ७ लाख ६९ हजार २५० हेक्टरवर पेरणी झाली होती़ यंदा ९८ टक्के पेरणी झाली आहे़ त्यात मृग आणि पुनवर्सू नक्षत्रानंतर जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे़ आतापर्यंत जिल्ह्यात केवळ २८ टक्के पाऊस झाला आहे़ त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद झाली आहे़ त्यामुळे विविध राजकीय पक्ष, संघटना, शेतकºयांकडून पीक विम्यासाठी मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती़
त्याबाबत सोमवारी शासनाने घोषणाही केली होती़ त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला होता़ परंतु मंगळवारी दिवसभर मुदतवाढी संदर्भात बँकांना आदेशच मिळाले नाहीत़
बँक अधिकारीही संभ्रमात होते़ त्यामुळे जिल्ह्यातील एकाही बँकेने आज दिवसभरात शेतकºयांचा पीक विमा स्वीकारला नाही़ त्यामुळे शेतकºयांना आल्या पावली परत जावे लागले असून मुदतवाढीचा पहिला दिवस वाया गेला़

Web Title: Fixed-order orders were not reached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.