आग बिलोलीत; बंबाची प्रतीक्षा देगलूर, धर्माबादहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:27 AM2018-04-14T00:27:19+5:302018-04-14T00:27:19+5:30

Flames; Waiting for bombs from Deglur, Dharmabad | आग बिलोलीत; बंबाची प्रतीक्षा देगलूर, धर्माबादहून

आग बिलोलीत; बंबाची प्रतीक्षा देगलूर, धर्माबादहून

googlenewsNext
ठळक मुद्दे२ वर्षांत ५० ठिकाणी आग : १२ जूनला महामंडळाचे २६ लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
ुबिलोली : तालुक्यात चार पोलीस ठाण्याच्या हद्दीअंतर्गत मागच्या दोन वर्षांत ५० ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत़ दरम्यान, २ पालिका, ७३ ग्रामपंचायत क्षेत्र व उपविभागीय कार्यालयाचा दर्जा असलेल्या बिलोली तालुक्यात कुठेच अग्निशमन दलाच्या बंबाची सोय नाही़ आपत्कालीन घटनेच्या वेळी देगलूर अथवा धर्माबादहून बंब येईपर्यंत सर्व काही जळून खाक होण्याचा प्रकार घडत आहे़
बिलोलीत १५ दिवसांपूर्वी महामार्गावरील चार दुकानाला लागलेली आग आटोक्यात न आल्याने सर्वकाही जळून खाक झाले़ ज्यामध्ये २० लाखांचे नुकसान झाले़ १२ जून २०१७ मध्ये बिलोली एस़टी़ महामंडळाच्या आगारात आग लागून संपूर्ण लेखा विभाग कार्यालय जळून गेले़ साधारणत: उन्हाळ्यात अशा घटना सातत्याने घडल्या आहेत़ शहरात यापूर्वी कुंडलवाडी मार्गावरील चार दुकाने त्यापाठोपाठ गांधीनगरच्या वळणावर असलेल्या वाहन दुरुस्ती दुकानांनाही आग लागली होती़
लगतच्या कुंडलवाडी, सगरोळी, लोहगाव, आदमपूर, आरळी, सर्कलमध्येही काही शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये आग लागण्याच्या वारंवार घटना घडल्या आहेत़ तालुक्यात कुंडलवाडी, बिलोली, रामतीर्थ व कुंटूर पोलीस ठाण्याचे क्षेत्र बिलोलीत येते़ अशा चार ठाण्यांतर्गत मागच्या काळात आग लागण्याच्या सतत घटना घडलेल्या आहेत़

तालुक्याचे क्षेत्र मोठे
तालुक्याचे क्षेत्र मोठे आहे; पण परिसरातच अग्निशमन दलाची कुठेच सोय नाही़ बिलोलीपासून धर्माबाद २३ कि़मी़ तर देगलूर ३५ कि़मी़ अंतरावर आहे़ येथील पालिकेकडे अग्निशमन दलाचा बंब आहे़ पण तेथून येईपर्यंत आग पसरलेली असते़ मागच्या दोन वर्षांत कुंडलवाडी, सगरोळी, सावळी, आदमपूर, कासराळी, बिलोली, डोणगाव आदी गावांत आग लागण्याच्या घटना घडल्या़ बिलोली तालुक्यात अग्निशमन दलाची गाडी आवश्यक आहे़

Web Title: Flames; Waiting for bombs from Deglur, Dharmabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.