हदगाव तहसील कार्यालय पाठभिंतीलगत गटार नाल्याचा पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:44 AM2020-12-11T04:44:35+5:302020-12-11T04:44:35+5:30
हदगाव नगरपालिका अंतर्गत वॉर्ड क्र.९ मधील नालीचे नवीन बांधकाम नियोजन व्यवस्थित दिशेने न झाल्यामुळे कित्येकदा नाली तुंबून ...
हदगाव नगरपालिका अंतर्गत वॉर्ड क्र.९ मधील नालीचे नवीन बांधकाम नियोजन व्यवस्थित दिशेने न झाल्यामुळे कित्येकदा नाली तुंबून घरात पाणी गेल्याच्या घटनाही मागे घडून गेल्याचे कळते. गटार नालीचे शेवटचे प्रवाह तोंड हे तहसील कार्यालय,पंचायत समिती व गटशिक्षण विभाग खाते या कार्यालयीन भिंत परिसरात घाणीचे डबके तयार झाले आहे तरी त्याची जाणीव कार्यालयीन कर्मचाऱ्यांना झाली नाही.मात्र, त्याचा त्रास भिंतीमागील यशवंतनगर, गौतमनगर व इतर नगरातील रहिवाशांना भयानक स्वरूपात भोगावा लागत आहे. या उग्र घाणीच्या पाण्यामुळे डेंग्यूसारख्या डासाचा, डुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर झाल्यामुळे रोगराईचे वातावरण पसरले आहे. येथील नागरिकांनी यासंदर्भात अनेकवेळा तक्रारी देऊनही प्रशासनाच्या वतीने कोणतेच स्वच्छतेचे पाऊल उचलले गेले नाही.सदरील प्रशासन जाणूनबुजून लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे का असा प्रश्न वानखेडे व येथील नागरिकांच्या वतीने केला जात आहे. याची प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी अन्यथा नागरिकांच्या बऱ्यावाईट आरोग्यास प्रशासन जबाबदार राहील असे वानखेडे यांनी निवेदनाद्वारे सांगितले.