नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईसह चाराटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:18 AM2019-06-17T00:18:08+5:302019-06-17T00:20:33+5:30

जिल्ह्यात जूनच्या मध्यातही पाणीटंचाईसह आता चाराटंचाईचेही तीव्र संकट निर्माण झाले आहे. यामुळे पशुधन जगवायचे कसे? असा प्रश्न बळीराजापुढे उभा राहिला आहे.

Fodder scarcity with water shortage in Nanded district | नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईसह चाराटंचाईचे संकट

नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईसह चाराटंचाईचे संकट

Next
ठळक मुद्देबळीराजा चिंताक्रांत पावसाचे आगमन लांबल्याने पेरण्याही खोळंबल्या

अनुराग पोवळे।
नांदेड : जिल्ह्यात जूनच्या मध्यातही पाणीटंचाईसह आता चाराटंचाईचेही तीव्र संकट निर्माण झाले आहे. यामुळे पशुधन जगवायचे कसे? असा प्रश्न बळीराजापुढे उभा राहिला आहे.
‘वायु’ वादळामुळे मान्सून लांबला आहे. १५ जूननंतरही जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठीच ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे. आजघडीला १४० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. बळीराजाने खरिपाची तयारी पूर्ण केली असली तरीही पावसाअभावी डोळे आकाशाकडे लागले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पशुधन आहे त्यांची चिंता दुपटीने वाढली आहे.
जिल्ह्यात ११ लाख ४४ हजार ७२५ इतकी पशुधनाची संख्या आहे. जिल्ह्यात १२ लाख ९६ हजार ९४१ मे. चारा उपलब्ध होता. जुलैअखेर ९७ हजार ७४६ मेट्रीक टन चा-याची तूट भासेल, असा अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला होता. मात्र हे कागदावरील आकडे आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यामध्ये मोठे अंतर आहे. चा-याची सोय नाही पण पिण्यासाठी पाणीही उपलब्ध करताना बळीराजा मेटाकुटीला आला आहे.
शासनाने जनावरांसाठी चारा छावणी उभारण्याचे आदेश दिले होते. मात्र चारा छावणीसाठी एका छावणीत किमान ३०० हून अधिक जनावरे असणे बंधनकारक केले होते. यासह अन्य तांत्रिक बाबीही अडचणीच्या ठरणाºया होत्या. यामुळे या चा-या छावण्या उभारण्याकडे दुर्लक्षच झाले.
जसजसा पाऊस लांबत आहे तसतशी चिंता वाढत आहे. जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत २ लाख ८० हजार ४६१ मेट्रीक टन चा-याची आवश्यकता भासणार आहे. यात ९७ हजार ७४६ मेट्रीक टन चा-याची तूट भासणार आहे. जिल्ह्यात जवळपास एक महिन्याचा चारा उपलब्ध असल्याचा अहवाल ४ जूनच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे.
जिल्ह्यात प्रतिदिन ४६४७ मे. टन चा-याची आवश्यकता
च्प्रतिमाह जिल्ह्याला १ लाख ४० हजार २३० मेट्रीक टन चा-याची आवश्यकता आहे. प्रतिदिन ४ हजार ६७४ मेट्रीक टन चारा जिल्ह्यासाठी आवश्यक आहे. जिल्ह्यात जुलैअखेर सर्वाधिक १२ हजार ६०९ मेट्रीक टन चाºयाची कमतरता मुखेड तालुक्यात तर कंधार तालुक्यात ८ हजार ९४७ मे.टन चारा कमी पडणार आहे.

 

Web Title: Fodder scarcity with water shortage in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.