जिल्हा रुग्णालयातच नियमांकडे पाठ; कशी रोखणार कोराेनाची तिसरी लाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:39 AM2021-09-02T04:39:30+5:302021-09-02T04:39:30+5:30

जिल्ह्यात डेंग्यू, टायफाईड, मलेरिया या आजाराची साथच पसरली आहे. तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत ...

Follow the rules at the district hospital itself; How to stop the third wave of Corana? | जिल्हा रुग्णालयातच नियमांकडे पाठ; कशी रोखणार कोराेनाची तिसरी लाट?

जिल्हा रुग्णालयातच नियमांकडे पाठ; कशी रोखणार कोराेनाची तिसरी लाट?

Next

जिल्ह्यात डेंग्यू, टायफाईड, मलेरिया या आजाराची साथच पसरली आहे. तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. यावेळी रुग्णांकडून कोरोना नियमावलींचे पालन होत नाही. गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यताही आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून या गर्दीवर आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

ओपीडी हाऊसफुल्ल

n जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. त्याचवेळी शहरातील अनेक नगरेही साथरोगाच्या विळख्यात अडकली आहेत.

n उपचारासाठी सामान्य नागरिक शासकीय रुग्णालयाची वाट धरत आहे. त्यामुळे रुग्णांची गर्दी वाढली आहे.

डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले

जिल्ह्यात डेंग्यूचे केवळ ३५ रुग्ण असल्याचा शासकीय अहवाल आहे. परंतु प्रत्यक्षात हजारो रुग्ण डेंग्यू, मलेरियाचे उपचार घेत आहेत. यात मुलांना डेंग्यूचा अधिक धोका निर्माण झाला आहे.

रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरू नये...

कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने आता सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. पण त्याचवेळी डेंग्यूचा आजार मोठ्या प्रमाणात फैलावला आहे. रुग्णालयातील गर्दीमुळे कोरोना वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

नियमांचे पालन करा

सध्या जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढले आहे. डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनीही घरातील स्वच्छता, परिसर स्वच्छता तसेच कोरडा दिवस पाळणे गरजेचे आहे. रुग्णालयात आल्यानंतरही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे.- डॉ. निळकंठ भोसीकर,

जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: Follow the rules at the district hospital itself; How to stop the third wave of Corana?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.