शाळांना भेटी देण्यासाठी स्वतंत्र पथक गठीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:20 AM2021-02-09T04:20:31+5:302021-02-09T04:20:31+5:30
शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. नियोजन समितीकडून वर्गखोल्यासाठी तरतूद उपलब्ध झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. शिक्षणाधिकारी माध्यमिक ...
शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. नियोजन समितीकडून वर्गखोल्यासाठी तरतूद उपलब्ध झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती, बंडू आमदूरकर, सर्व गटशिक्षणाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती. सभापती संजय बेळगे यांनी गटशिक्षणाधिकारी यांचा आढावा घेतला. कोविडनंतर शाळा सुरू झाल्या असल्यामुळे शाळांमधील उपस्थिती कशी आहे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी प्रयत्न काय करण्यात येत आहेत, विद्यार्थी शाळेत नियमित उपस्थित राहण्यासाठी शाळा स्तरावर कुठले प्रयत्न केले आहेत, याबाबत त्यांनी विचारणा केली.
गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यात दिलेल्या शाळा भेटी व शाळा भेटी दरम्यान आढळलेल्या बाबींची माहिती यावेळी सादर केली. जिल्हा नियोजन समितीकडून शाळा खोली बांधकामासाठी निधी प्राप्त झाला असून संबंधित जिल्हा परिषद सदस्यांच्या सल्ल्याने शाळा निश्चित करून गटशिक्षणाधिकारी यांनी सदर कामे पूर्ण करण्याचे आवाहन सभापती संजय बेळगे यांनी केले