माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांचे निधन; सरपंच ते विधानसभा सदस्य असा राजकीय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 09:18 AM2024-03-08T09:18:49+5:302024-03-08T09:23:01+5:30

१९९९ मध्ये ते बिलोली विधानसभेतून जनता दलतर्फे ते विजयी झाले होते. दिवंगत माजी मंत्री गंगाधरराव कुंटुरकर यांचा पराभव करुन ते विधानसभेत पोहोचले होते.

Former mla Gangaram Thakkarwad passed away; Political Journey from Sarpanch to Assembly Member | माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांचे निधन; सरपंच ते विधानसभा सदस्य असा राजकीय प्रवास

माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांचे निधन; सरपंच ते विधानसभा सदस्य असा राजकीय प्रवास

बिलोली - देगलूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार गंगाराम पोशट्टी ठक्करवाड यांचे शुक्रवारी मध्यरात्री दिर्घ आजाराने निधन झाले.  कासराळी  ता.बिलोली येथील ग्रामपंचायतीचे सरपंच ते विधानसभा सदस्य असा ठक्करवाड यांचा राजकीय प्रवास राहीला आहे. 

१९९९ मध्ये ते बिलोली विधानसभेतून जनता दलतर्फे ते विजयी झाले होते. दिवंगत माजी मंत्री गंगाधरराव कुंटुरकर यांचा पराभव करुन ते विधानसभेत पोहोचले होते. यामुळे  त्यांची मोठी चर्चा झाली. २००३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री  विलासराव देशमुख यांच्या काँग्रेस आघाडीत ते सहभागी झाले होते, त्यावेळी अविश्वास ठरावाच्यावेळी ते शिवसेना - भाजपा युतीच्या बाजुने उभे राहीले होते. 

दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे ठक्करवाड हे निकटवर्तीय मानले जात होते. ठक्करवाड यांच्यावर कासराळी येथेच शुक्रवारी ०८ मार्च रोजी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Former mla Gangaram Thakkarwad passed away; Political Journey from Sarpanch to Assembly Member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.