शिवसेना ठाकरे गटाच्या माजी आमदार अनुसया खेडकरांना ५ वर्षांची शिक्षा

By शिवराज बिचेवार | Published: April 11, 2023 04:33 PM2023-04-11T16:33:34+5:302023-04-11T16:33:54+5:30

महागाई विरोधात हिंसक आंदोलन प्रकरणी नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाची शिक्षा

Former Shiv Sena MLA Anusaya Khedkar, Sena-BJP office bearer sentenced to 5 years | शिवसेना ठाकरे गटाच्या माजी आमदार अनुसया खेडकरांना ५ वर्षांची शिक्षा

शिवसेना ठाकरे गटाच्या माजी आमदार अनुसया खेडकरांना ५ वर्षांची शिक्षा

googlenewsNext

नांदेड - हिंसक आंदोलन प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या माजी आमदार अनुसया खेडकर , त्यांचे पुत्र महेश खेडकर, सेनेचे जिल्हाप्रमख दत्ता कोकाटे यांच्यासह सेना - भाजपाचा 19 जणांना पाच वर्षाची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. तसेच प्रत्येक आरोपीला एक लाख साठ हजार रुपये दंड न्यायालयाने  ठोठावला आहे. 

2008 साली महागाई विरोधात शिवसेनेने आंदोलन  केले होते. यावेळी आंदोलनास हिंसक वळण लागले होते. यात आठ एसटी बसेस एका पालिकेच्या बसचे नुकसान झाले होते. तसेच दोन पोलीस जखमी झाले होते. याप्रकरणी नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाने आज सेना- भाजपच्या तब्बल १९ पदाधिकाऱ्यांना दोषी ठरवत शिक्षा सुनवली. याप्रकरणी मालमत्ता नुकसान प्रकरणी एसटी महामंडळ , महापालिका , आंध्र प्रदेश एस टी विभाग , दोन जखमीना भरपाई देण्यात येणार आहे. 

( सविस्तर वृत्त लवकरच) 

Web Title: Former Shiv Sena MLA Anusaya Khedkar, Sena-BJP office bearer sentenced to 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.