कंधारच्या भुईकोट किल्ल्यात आढळला हौद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 01:01 AM2018-07-23T01:01:23+5:302018-07-23T01:01:49+5:30
राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ल्यास पूर्ववैभव प्राप्त करुन देण्यासाठी पावणेपाच कोटींतून जतन-दुरुस्तीची कामे केली जात आहेत़ दरम्यान, कसबन महालासमोर खोदकाम करताना अत्यंत देखणा अष्टकोनी आकारातील कारंजे असलेला हौद आढळले. पुरातत्त्व विभागाने समन्वयकास पाठवून त्यांच्या देखरेखीखाली आणखी महत्त्वपूर्ण वास्तू अवशेष सापडतील म्हणून खोदकाम केले जात आहे़ कारंजे हौद, दगडी गोळे, उखळ आदी आढळल्याने आणखी ऐतिहासिक वास्तू सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे़
गंगाधर तोगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
कंधार : राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ल्यास पूर्ववैभव प्राप्त करुन देण्यासाठी पावणेपाच कोटींतून जतन-दुरुस्तीची कामे केली जात आहेत़ दरम्यान, कसबन महालासमोर खोदकाम करताना अत्यंत देखणा अष्टकोनी आकारातील कारंजे असलेला हौद आढळले. पुरातत्त्व विभागाने समन्वयकास पाठवून त्यांच्या देखरेखीखाली आणखी महत्त्वपूर्ण वास्तू अवशेष सापडतील म्हणून खोदकाम केले जात आहे़ कारंजे हौद, दगडी गोळे, उखळ आदी आढळल्याने आणखी ऐतिहासिक वास्तू सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे़
राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ला २४ एकरवर उभारण्यात आला आहे़ स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या किल्ल्यात विविध ऐतिहासिक वास्तूची निर्मिती करण्यात आली़ त्यात अनेक वास्तूची भर टाकण्याचे काम अनेक राजे व किल्लेदार यांनी केले़ त्यामुळे विस्तीर्ण किल्ल्याच्या वैभवात व सौंदर्यात भर पडली़ परंतु, काळाच्या ओघात अनेक वास्तूंचे भग्नावशेष झाले़ खिंडार बनले. मोडकळीस आल्या़ शासन, पुरातत्त्व विभागाने कोट्यवधीच्या निधीतून अनेक कामे करत किल्ला सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न केला़ मागील वर्षापासून किल्ला जतन-दुरुस्तीचे काम अतिशय गतीने चालू आहे़ किल्ल्यात कसबन महाल दुर्लक्षित झाला होता़ झाडे-झुडपे, मलबा आदीने अतिशय सुंदर कलाकृती असलेली वास्तू अडगळीला पडली होती़ त्याचे काम करण्यात येत आहे़ महालासमोर खोदकाम करत असताना ३़६० बाय ३़६० मीटर चौकोनी व अष्टकोणी असलेले व एक मीटर खोलीचे कारंजे हौद आढळले़ वीट व चुन्याचे बांधकाम केलेले, कारंजेसाठी पाईप, पाणी बाहेर जाण्यासाठीची व्यवस्था असलेला हौद कसबन महालात असलेल्या भिंतीवरील कलाकृतीची प्रतिकृतीच आहे़ एकूण बांधकाम शैलीवरून ही वास्तू १५-१६ व्या शतकातील असावी़ या महालाच्या पाठीमागे लाल महाल असून त्यासमोर कारंजे हौद आहे़
---
यापूर्वीही खोदकामात आढळली गरूडमूर्ती
कसबन महालाच्या पाठीमागे पथमार्ग करताना २००५ साली खोदकामात गरूडमूर्ती आढळली होती़ या परिसराजवळच निजामकालीन १० ते १५ नाणे १९८० च्या दरम्यान आढळले असल्याचे सांगण्यात येते़ कारंजे, हौद आढळल्याने औरंगाबाद व नांदेडचे सहाय्यक संचालक अजित खंदारे यांनी तत्काळ पुरातत्त्व समन्वयक डॉक़ामाजी डक यांना कंधारला पाठविले़ त्यांच्या देखरेखीखाली खोदकाम चालू आहे़ खोदकामात नवीन ऐतिहासिक अवशेष आढळतात का याची उत्सुकता इतिहासप्रेमी व पर्यटकांना लागली आहे़ किल्ल्यातील अनेक वास्तू साफसफाई, मलबा हटविण्याच्या प्रतीक्षेत आहेत़ हे काम केल्यास पुरातन वास्तू अवशेष उजेडात येण्याची शक्यता आहे़ आढळलेला कारंजे हौद नेमका कोणत्या कालखंडातील आहे, हे समजण्यासाठी तेथे शिलालेख नाही़ त्यामुळे मोगल काळातील असावा असे सांगितले जात आहे़
---
एक मीटर खोलीचे कारंजे
मागील वर्षापासून किल्ला जतन-दुरुस्तीचे काम अतिशय गतीने चालू आहेत़ किल्ल्यात कसबन महाल दुर्लक्षित झाला होता़ झाडेझुडपे, मलबा आदीने अतिशय सुंदर कलाकृती असलेली वास्तू अडगळीला पडली होती़ त्याचे काम करण्यात येत आहे़
महालासमोर खोदकाम करत असताना ३़६० बाय ३़६० मीटर चौकोनी व अष्टकोणी असलेले व एक मीटर खोलीचे कारंजे हौद आढळले़ वीट व चुन्याचे बांधकाम केलेले, कारंजेसाठी पाईप, पाणी बाहेर जाण्यासाठीची व्यवस्था आहे़
---
कारंजे हौदाच्या एकंदरीत रचनेवरून हे १५ व्या किंवा १६ व्या शतकातील असावे़ शिलालेख नसल्यामुळे नेमका कालखंड सांगणे कठीण आहे़ खोदकाम चालू आहे़ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे़ आढळलेला हा हौद वैशिष्ट्यपूर्ण असा आहे़ खोदकामात आणखी वास्तू, अवशेष आढळतात का? हे पाहिले जाईल -डॉक़ामाजी डक, पुरातत्त्व समन्वयक, औरंगाबाद़
---
किल्ल्यातील खोदकामात आढळलेला कारंजे हौद हा मोगल काळातील असावा़ हौदाचे बांधकाम व रचना त्या पद्धतीची वाटते़ शिलालेख असता तर स्पष्टपणे त्याचा कालखंड उलगडला असता़ ऐतिहासिक किल्ल्यात योग्य उत्खनन केले तर अनेक वास्तू-अवशेष आढळतील़ तसेच मानसपुरी येथील संरक्षित क्षेत्रात उत्खनन करण्याची गरज आहे. - प्रो़ डॉ़ अनिल कठारे, इतिहास संशोधक, श्री शिवाजी कॉलेज, कंधाऱ