लाेह्यात चार कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:22 AM2021-02-25T04:22:06+5:302021-02-25T04:22:06+5:30

तळेगावात जयंंती साजरी उमरी : राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती तळेगाव येथे साजरी करण्यात आली. यावेळी सुरेशराव देशमुख, ग्रामविकास अधिकारी ...

Four corona patients in Lahia | लाेह्यात चार कोरोना रुग्ण

लाेह्यात चार कोरोना रुग्ण

googlenewsNext

तळेगावात जयंंती साजरी

उमरी : राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती तळेगाव येथे साजरी करण्यात आली. यावेळी सुरेशराव देशमुख, ग्रामविकास अधिकारी फुलारी, बशीर बेग, भगवान जाधव, विजय पवार, गजानन जाधव, गंगाराम जाधव आदी उपस्थित होते.

१४ लाखांची देणगी

अर्धापूर : अयोध्या येथील नियोजित राम मंदिरासाठी शहर व तालुक्यातून १४ लाखांचा निधी जमा करण्यात आला. यावेळी दिगंबर महाराज यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृष्णा देशमुख, रामदास निकम, अमित हुंडे, सदाशिव दुधाटे, ॲड.बालाजी कदम, प्रवीण देशमुख आदी उपस्थित होते.

क्रिकेटचे खुले सामने

उमरी : तालुक्यातील रामखडक येथे शिवजयंतीनिमित्त खुल्या क्रिकेट स्पर्धा घेण्यात येत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन शिरीषराव देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी भास्कर भिलवंडे, अभिषेक दिंडोरीकर, सुधाकरराव देशमुख, देविदास करपे, राजू पाटील, शाम पाटील, गजानन पाटील, पांडुरंग गळगे, गणेश वडजे, आनंदराव जाधव आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना मदत द्या

उमरी : काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले. उमरी, धर्माबाद, नायगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी वाघलवाडा साखर कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे यांनी केली. दरम्यान, वीज पडून मृत झालेले माधव वाघमारे यांच्या घरी जाऊन कवळे यांनी त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.

चाचणी शिबिरात सहभाग

भोकर : नांदेड येथे पार पडलेल्या स्काउटच्या चाचणी शिबिरात जि.प.कें.प्रा. शाळा भोकरचे चार विद्यार्थी सहभागी झाले होते. यात आदित्य अविनाश जाधव, आशिष धम्मरत्न वाघमारे, श्रीकांत सायबू अनरवाड आणि सूरज बाबाराव हुरदुके, तसेच स्काउट मास्टर श्रीकांत गोरशेटवार सहभागी झाले होते.

चिंतन दिन साजरा

कुंडलवाडी : येथील गंगाबाई सब्बनवार प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्काउट गाइड चळवळीचे जनक लॉर्डबेडन यांचा जन्म दिवस चिंतन दिन म्हणून साजरा करण्यात आला. गाइडर मद्दलवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गंगाधरराव सब्बनवार, सेवानिवृत्त डीवायएसपी चंद्रकांत अलसटवार, मुख्याध्यापक साईनाथ बाभळीकर, नागनाथ चेटलुरे, विद्या वाघमारे, रमेश जाधव, राजू जायेवार, दत्तात्रय अर्धापुरे आदी उपस्थित होते.

रास्ता रोको आंदोलन

किनवट : मौजे कौठारी ची. ते इस्लापूर राष्ट्रीय कामाच्या धुळीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तालुका कृषी अधिकारी यांनी पिकांची पाहणी करावी, या मागणीसाठी चिखली बसस्टँड येथे बहुजन मुक्ती पार्टी व शेतकऱ्यांच्या वतीने २२ रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष पाटील, शेख मेहबूब, चंद्रकांत सोनकांबळे, शब्बीर खान, महेंद्र गोपने, विजय जाेगदंड, अंबादास मेश्राम, व्यंकटराव पवार, अशोकराव भगत आदी सहभागी झाले होते.

स्वच्छता अभियान

बिलोली : येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात येऊन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी एस.पी. भैरवाड, समतादूत शेख इरशाद, कनिष्ठ सहायक नवाबपाशा, चाऊस हसन, एम.एम.शेख, एस.जी.राठोड, श्रीमती मेहमुदा बेगम, जेटलावार आदी उपस्थित होते.

अध्यक्षपदी संदीप गंगासागरे

भोकर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे भोकर तालुकाध्यक्ष म्हणून संदीप गंगासागरे यांची निवड झाली. जिल्हाध्यक्ष कपिल जुन्नेकर यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. या निवडीचे सिद्धू पाटील चिंचाळकर, आनंद पाटील, यशोदाबाई शेळके, उमेशकापसे, आनंद पाटील हस्सापूरकर आदींनी स्वागत केले.

Web Title: Four corona patients in Lahia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.