चौघे मांडूळ तस्कर नांदेडमध्ये पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 07:56 PM2020-02-19T19:56:27+5:302020-02-19T19:57:10+5:30
मांडूळ वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे़त
नांदेड : नांदेड शहरानजीक असलेल्या आसना नदी परिसरातून चार मांडूळ तस्करांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले़ या तस्करांकडून साडेचार लाख रुपये किमतीचे तीन मांडूळ जप्त करण्यात आले आहेत़ त्यानंतर हे मांडूळ वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे़त.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि़.द्वारकादास चिखलीकर यांना खबऱ्याकडून मांडूळ तस्कराबाबत माहिती मिळाली होती़ दुपारी साडे बाराच्या सुमारास सपोनि़ मांजरमकर यांच्या पथकाला अर्धापूर हद्दीत आसना नदीशेजारी असलेल्या गुरुद्वाराच्या बाजूस काही जण आढळून आले़ पोलिसांनी लगेच छापा टाकून भीमराव ऊर्फ संतोष पुजाराम बिºहाडे (२९, रा. कारला, ता़ हिमायतनगर) शेख सलमान शेख आजीम (२४,रा़ टाटीगुडा, आदिलाबाद,) सय्यद मूसा सय्यद युसूफ (४२,रा़ तेहरानगर, नांदेड) आणि अजमतखान समंदरखान पठाण (५०, रा़ माजलगाव) या चार जणांना अटक केली. तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडून तीन मांडूळ जप्त करण्यात आले़ त्यामध्ये पहिले मांडूळ २ किलो १४० ग्रॅम, दुसरे मांडूळ १ किलो ९३० ग्रॅम आणि तिसरे मांडूळ ९७० ग्रॅम वजनाचे आढळले. तिन्ही मांडूळाची बाजारपेठेत किमंत अंदाजे साडे चार लाख रुपये असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला़
या मांडूळांना डबल इंजन, डबल मुव्हमेंट या नावाने ओळखले जात असल्याचे आरोपींनी सांगितले़ हे मांडूळ वनविभागाच्या ताब्यात दिले आहेत़ ही कारवाई पोलीस अधीक्षक विजय मगर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सुनील नाईक, पोउपनि. राठोड, सपोउपनि. चव्हाण, भानूदास वडजे, मारोती तेलंग, दिनानाथ श्ािंदे, दशरथ जांभळीकर, विष्णू इंगळे, तानाजी येळगे, देवा चव्हाण, बजरंग बोडके, विलास कदम, राजू पुलेवार यांनी केली़