मोफत इनोव्हा कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:17 AM2021-04-06T04:17:01+5:302021-04-06T04:17:01+5:30
इसापूरचे पाणी सोडा हिमायतनगर - इसापूर प्रकल्पातील पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात यावे अशी मागणी नदीकाठच्या ग्रामस्थांनी आ.माधवराव पाटील ...
इसापूरचे पाणी सोडा
हिमायतनगर - इसापूर प्रकल्पातील पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात यावे अशी मागणी नदीकाठच्या ग्रामस्थांनी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे केली. पाणी सोडल्यास शेतीला, जनावरांच्या पिण्याचे पाणी तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
वणवा पेटलेला
किनवट - मांडवी वनपरीक्षेत्रांतर्गत असलेल्या उनकेश्वर जंगलात मागील सहा दिवसापासून वणवा पेटलेला आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील वन व रोपवन जळाले. यामुळे अनेक दुर्मिळ सागवान झाडे जळून खाक झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. किनवट वनविभागाने मात्र याकडे अद्यापही लक्ष दिले नाही.
ज्येष्ठ नागरिकांनी घेतली लस
बिलोली - कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या हज्जापूर येथे कोविड लसीकरणाला सुरुवात झाल. यावेळी ६०ज्येष्ठ नागरिकांनी कोविडची लस घेतली. नागरिकांनी न घाबरता कोविडची लस घ्यावी असे आवाहन कुंडलवाडीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.
डांबरीकरणाला सुरुवात
लोहा - तालुक्यातील शेवडी बाजीराव ते सोनखेड रस्त्याचे पक्के डांबरीकरण झाले. त्यामुळे प्रवासी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला. सोनखेडपासून जवळच कपिलेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिराच्या दर्शनासाठी जवळा, भेंडेगाव, शेलवाडी, हरबळ, बेटसांगवी, पेनूर, कारवा, जामगा शिवणी आदी गावांसह नांदेडहून मोठ्या प्रमाणात भाविकभक्त येतात. रस्त्यावर दिवसभर वर्दळ असते. खराब रस्त्यामुळे वाहतूक करणे जिकीरीचे होते. रस्त्याचे डांबरीकरण व्हावे अशी मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली आहे.
कंधारात फटाक्यांची आतषबाजी
कंधार - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चिखलीकर पिता-पूत्रांनी विजय मिळविल्याबद्दल कंधार शहर व तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. प्रतापराव चिखलीकर यांना लोहा मतदारसंघात ४७ पैकी ४२तर कंधारमधून प्रवीण पाटील २४ पैकी १६ मते घेवून विजयी झाले.
किनवटमध्ये शिवजयंती
किनवट - येथील शिवसेनेच्या वतीने तिथीप्रमाणे शिवाजी चौकात ध्वजारोहण करून महाराजांच्या पुतळ्यास पूष्पहार अर्पण करण्यात येवून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, मारोती सुंकलवार, शरद जयस्वाल, सुनील गरड, संतोष जाधव, शेख अफसर, कपिल रेड्डी आदी उपस्थित होते.