२९ हजारांवर विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:52 AM2019-05-30T00:52:10+5:302019-05-30T00:53:44+5:30

तालुक्यात जि.प. व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातंर्गत मोफत पाठयपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे.

Free Textbooks for 29 Thousand Students | २९ हजारांवर विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके

२९ हजारांवर विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षण विभागाने केली तयारी

कंधार : तालुक्यात जि.प. व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातंर्गत मोफत पाठयपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे. मराठी, सेमी, उर्दू माध्यमातील २५७ शाळेतील २९ हजार ६८५ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जून महिन्यात शाळा प्रवेश दिनीच पुस्तके वितरण करण्याची तयारी शिक्षण विभागाने केली असल्याचे समोर आले आहे.
तालुक्यात जि.प.च्या १८७ ,खाजगी अनुदानित ६५ व उर्दु माध्यमाच्या ५ शाळांना समग्र शिक्षा अभियानातंर्गत मोफत पाठयपुस्तक योजनेचा लाभ मिळणार आहे.इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींना याचा लाभ होणार आहे. मागणी नुसार १ लाख ८२ हजार ८३१ पुस्तके प्रति विषयनिहाय तीन माध्यमासाठी प्राप्त झाली आहेत. त्याचे वितरण जून महिन्यात शाळा प्रवेश दिनी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
३ जून ते १२ जून या कालावधीत कंधार, शेकापूर, फुलवळ, बहाद्दरपुरा, पानभोसी, कुरूळा, बोळका, दिग्रस, आंबुलगा, रूई, कौठा, बारूळ, चिखली, मंगलसांगवी, गोणार, शिराढोण, उस्माननगर या केंद्रावर पुस्तके वितरण केले जाणार आहेत. गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली व विस्तार अधिकारी नंदकुमार कौठेकर यांच्या सहकार्यातून पी.एल.नरहरे, एस.आर.कनोजवार, ओ.एस.येरमे, अशोक डिकळे, अनंत तपासे, एस.एस.मलगीरवार, पी.जी.काळे, डी.एस.चाटे, एस.बी.सूर्यवंशी, बी.जी.निवळे, प्रतिभा सोनकांबळे, ज्योती स्वामी आदीनी वितरणाचे नियोजन केले आहे.
शाळा प्रवेशा दिनीच विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शिक्षण प्रेमीतून समाधान व्यक्त केले जात आहे.
बालभारती, माय इंग्लिश बुक, गणित, खेळ-करू-शिकू, सुलभभारती, प.अ.नांदेड जिल्हा, प.अभ्यास भाग १, भाग २, सामान्य विज्ञान, इतिहास नागरिकशास्त्र, भूगोल आदी विषयाचा समावेश आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी वेळेत पाठयपुस्तके मिळणे आवश्यक असते. त्यासाठी प्राप्त पुस्तकाचे वितरण हे शाळेच्या पहिल्या दिवशी करण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे.
विषयनिहाय प्रतीचे वितरण
इयत्ता पहिली मधील ३ हजार ३६५ विद्यार्थ्यांसाठी चार विषयाच्या विद्यार्थी व विषय निहाय प्रतीचे वितरण केले जाणार आहे. दुसरीतील ३ हजार ५६१ विद्यार्थी व चार विषय, तिसरी मधील ३ हजार ५५९ विद्यार्थी व पाच विषय आहेत़
चौथीतील ३ हजार ८५२ विद्यार्थी व सहा विषय,पाचवीतील ३ हजार ८५६, विद्यार्थी व सहा विषय, सहावीतील ३ हजार ७४४ विद्यार्थी व सात विषय, सातवीतील ३ हजार ७०८ विद्यार्थी व सात विषय व आठवीतील ३ हजार ८४० विद्यार्थ्यांना सात विषय निहाय प्रतिचे वितरण केले जाणार आहे.

Web Title: Free Textbooks for 29 Thousand Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.