वीजपुरवठा वारंवार खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:18 AM2020-12-06T04:18:59+5:302020-12-06T04:18:59+5:30
परिसरात शेती करिता एक आठवडा दिवसा व एक आठवडा रात्री असा आठ तास वीजपुरवठा मिळतो. परंतु मिळणारा वीजपुरवठा खंडित ...
परिसरात शेती करिता एक आठवडा दिवसा व एक आठवडा रात्री असा आठ तास वीजपुरवठा मिळतो. परंतु मिळणारा वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना रात्री थंडीत आणि अंधारात शेतातच काढावी लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत झाला की विद्युत पंपाचे बटन दाबले अन् पाणी पुरवठा सुरू झाला की लगेच वीजपुरवठा खंडित होत असल्याने पुन्हा वीज येण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे दोन दिवसात भिजणाऱ्या रानाला चार ते पाच दिवस लागत आहेत . वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने विहीर, बोअरला मुबलक पाणी असूनही रब्बी हंगामातील हरभरा, गहू या पिकाला पाणी देता येईना यामुळे पिके वाळून जाण्याची भीती वाटत नाही. यामुळे सुरळीत वीजपुरवठा करण्याची शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.