तिसऱ्या लाटेची धास्ती, गावात रुग्ण आढळताच केली शाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:18 AM2021-08-01T04:18:12+5:302021-08-01T04:18:12+5:30
चौकट- दहा दिवसांत १ शाळा बंद ......................... - कोरोनाचे सर्व नियम, अटी पाळूनच शाळा सुरू करण्यात आल्या. शाळा उघडण्यासाठी ...
चौकट-
दहा दिवसांत १ शाळा बंद
.........................
- कोरोनाचे सर्व नियम, अटी पाळूनच शाळा सुरू करण्यात आल्या. शाळा उघडण्यासाठी ग्रामपंचायतीकडून तसेच पालकांकडून संमती मिळाल्यानंतर वर्ग भरले. सध्या जिल्ह्यात दररोज सहा, सात कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यात ग्रामीण भागातील पाच, सहा आहेत. त्यामुळे एखादा रुग्ण गावात आढळला, तर त्या ठिकाणी शाळा बंद केली जात आहे. सध्या धर्माबाद तालुक्यातील एक शाळा कोरोना रुग्ण आढळल्याने बंद करावी लागली आहे.
चौकट-
विद्यार्थी मजेत, पालक चिंतेत
...........................
१. कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्यामुळे शाळा उघडण्यात आल्या; मात्र आता तिसऱ्या लाटेची भीती दाखवली जात आहे. या लाटेत मुलांना अधिक भीती असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेविषयी काळजी वाटत आहे. - गंगाधर गायकवाड, पालक
२. मागीलवर्षी शाळेत जायला मिळाले नाही. यंदाही कोरोनामुळे शाळा उघडल्या नाहीत. त्यामुळे आमचा हिरमोड झाला होता. १५ जून रोजी शाळा सुरू झाल्या; मात्र विद्यार्थ्यांसाठी शाळा बंदच होत्या. मात्र आता शाळा उघडल्याने आम्ही आनंदी झालो आहोत. - करुणा घोडके, विद्यार्थिनी
३. शाळा सुरू झाल्यामुळे आम्ही सर्व खूप आनंदी आहोत. घरी बसून कंटाळा आला होता. आता शाळा बंद होऊ नयेत, असे वाटते. प्रत्यक्ष शाळेत येऊन शिक्षण घेण्यात जो आनंद आहे, तो ऑनलाईन शिक्षणात मिळत नाही. - यश सारकी
जिल्ह्यात एकूण शाळा - ६०३, सध्या सुरू असलेल्या शाळा ५३७
चौकट-कोरोनाचे नियम पाळावेत
सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी हाेत असली तरी कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे ज्या शाळा सुरू झाल्या आहेत, त्यांना खूप खबरदारी घ्यावी लागणार आहे. संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी पालकांना, विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना नियमांचे पालन करावे लागेल. शाळा सुरू ठेवण्यासाठी कोरोना नियमांचे सर्वांनी पालन करावे - माधव सलगर, शिक्षणाधिकारी, नांदेड.