शिवजन्मोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:31 AM2021-02-18T04:31:42+5:302021-02-18T04:31:42+5:30
नांदेड : सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमाने साजरा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेत कार्यक्रमांचे ...
नांदेड : सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमाने साजरा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेत कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे समितीने पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला १८ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ रात्री ७ वाजता दीपोत्सव तर शुक्रवार (दि. १९) सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शिवपूजन, हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, दुपारी १२ वाजता उपस्थित शिवप्रेमी नागरिकांसाठी अन्नदान वाटप, भव्य स्त्रीरोग निदान शिबिर कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी (दि.२०) संध्याकाळी ७ वाजता रोजी विविध क्षेत्रांत कोरोना योद्धांचा सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे, पालकमंत्री अशोकराव चव्हाण, खा. प्रतापराव पाटील-चिखलीकर, खा. हेमंत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी आ. राम पाटील, आ. अमरनाथ राजूरकर, आ. बालाजी कल्याणकर, आ. मोहनराव हंबर्डे यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी हवामानतज्ज्ञ पंजाब डख पाटील यांचा प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम, तसेच जागर शिवसह्याद्रीच्या या प्रा. अनिता नळे व संच यांचे शिवकालीन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती समितीचे प्रसिद्धीप्रमुख भागवत देवसरकर यांनी दिली आहे.
सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुश देवसरकर, धनंजय पाटील, भागवत देवसरकर, शंकर पवार, प्रा. प्रभाकर जाधव, दिलीप शिरसाट, विनायक चव्हाण, बालाजी इंगळे, रवी ढगे-पाटील, डॉ. प्रशांत तावडे, संदीप पावडे, प्रशांत आबादार, पीयूष शिंदे, मोतीराम पवार, सुनील ताकतोडे, विजय शिंदे, मंगल चव्हाण, ज्ञानोबा गायकवाड, पांडुरंग पोपले, मंगल चव्हाण, उद्धव तिडके आदींनी केले आहे.