हायड्रोसील शस्त्रक्रियेत मुखेड जिल्ह्यात पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:50 AM2021-02-20T04:50:11+5:302021-02-20T04:50:11+5:30

मुखेड - येथील उपजिल्हा रुग्णालय येथे १९ फेब्रुवारी रोजी हायड्रोसीलच्या १७ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हायड्रोसील ...

Further in Mukhed district in hydrocele surgery | हायड्रोसील शस्त्रक्रियेत मुखेड जिल्ह्यात पुढे

हायड्रोसील शस्त्रक्रियेत मुखेड जिल्ह्यात पुढे

Next

मुखेड - येथील उपजिल्हा रुग्णालय येथे १९ फेब्रुवारी रोजी हायड्रोसीलच्या १७ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हायड्रोसील शस्त्रक्रिया करण्यात मुखेड तालुका आघाडीवर आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या सूचनेनुसार व जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ. आकाश देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे हायड्रोसील शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. मुखेड तालुक्यासाठी ३१ मार्चअखेर ३९ रुग्णांचे उद्दिष्ट असून, फेब्रुवारीपर्यंत ३३ रुग्णांच्या शस्त्रक्रिया झाल्यामुळे तालुका जिल्ह्यात पुढे आहे. या शिबिरासाठी सर्जन डॉ. गोपाळ शिंदे व भूलतज्ज्ञ डॉ. अनिल थडके व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. शिबिर यशस्वीतेसाठी आरोग्य पर्यवेक्षक व्यंकटराव माचनवाड, आरोग्य सहाय्यक राजकुमार ढवळे, आरोग्यसेवक बाबासाहेब चापुले, विशाल बनसोडे, नरसिंग पांचाळ, साईनाथ मेढेकर, संदीप घाटे, शिवकुमार चोंडीकर यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Further in Mukhed district in hydrocele surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.