‘लोकमत’ व व्हेल्लूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजीतर्फे ‘फ्युचर मंत्रा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:27 AM2018-12-01T00:27:21+5:302018-12-01T00:29:30+5:30
नांदेड : लोकमत व व्हीआयटी (व्हेल्लूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी) तर्फे 'फ्युचर मंत्रा' या सेमिनारचे आयोजन रविवार, २ डिसेंबर रोजी ...
नांदेड : लोकमत व व्हीआयटी (व्हेल्लूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी) तर्फे 'फ्युचर मंत्रा' या सेमिनारचे आयोजन रविवार, २ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम रोड, नांदेड येथे करण्यात करण्यात आले आहे़ या सेमिनारमध्ये व्हीआयटीचे प्रोफेसर डॉ़ पुंडलिक भगत, आयआयटी, जेईई आणि नीट केमिस्ट्री विषयाचे तज्ज्ञ डॉ़ रंजित शाही, कोनाळेज् आयआयटी जेईई सेंटरचे संचालक व्ही़ डी़ कोनाळे, शहा इंडस्ट्रीजचे संचालक व सीए हर्षदभाई शहा हे मार्गदर्शन करणार आहेत़
बारावीनंतर नेमके काय करावे, हा अनेक विद्यार्थ्यांना विचारात टाकणारा प्रश्न आहे़ आज करिअर कुठल्याही एक-दोन क्षेत्रांसाठी मर्यादित राहिलेले नाही़ विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाजोगते करिअर करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत़ ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना करिअरसंबंधी पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच, बारावीनंतर नेमके काय करावे? कोणते स्पेशलायझेशन करावे, त्यासाठी योग्य इन्स्टिट्युट कसे निवडावे, अॅडमिशनची पद्धत कशी असणार, त्यासाठी कोणती तयारी करावी, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे ‘फ्युचर मंत्रा’ कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत़
या वाढत्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट करिअर करण्याच्या इच्छाशक्तीला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली तर यश आपल्या मुठीत आहे़ शिक्षणाच्या या टप्प्यावर पडणाºया अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 'लोकमत'ने या सेमिनारद्वारे विद्यार्थ्यांना एक प्रकारचे व्यासपीठच उपलब्ध करून दिले आहे़ विद्यार्थी आणि त्यांचे पालक या दोघांसाठीही हा सेमिनार मार्गदर्शक ठरणार आहे़
सेमिनार मोफत
हा सेमिनार मोफत असून, यात सर्वांसाठीच प्रवेश खुला आहे़ तरी पालकांनी व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे़
सेमिनारला उपस्थित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे़ शिवाय सोडतीद्वारे ब्ल्युटूथ स्पिकर जिंकण्याची संधी मिळणार आहे़
वार : रविवार, ०२ डिसेंबर २०१८़ ४वेळ: दुपारी ४ वाजता़
स्थळ : शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम रोड, नांदेड
अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ९०२८६१०९९४