फ्युचर मंत्राने दिला विद्यार्थ्यांना आत्मविश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 01:11 AM2018-12-04T01:11:49+5:302018-12-04T01:13:36+5:30
आज करिअरचे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत़ त्यामधून आपला कल जाणून घेऊन उत्तम पर्याय कसा निवडायचा, हे विद्यार्थ्यांनी लोकमत आणि व्हीआयटी (व्हेल्लूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी) च्या वतीने आयोजित ‘फ्युचर मंत्रा’ या कार्यक्रमातून जाणले व सर्वच विद्यार्थ्यांना करिअरसंबंधी एक नवा आत्मविश्वास मिळाला़
नांदेड : आज करिअरचे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत़ त्यामधून आपला कल जाणून घेऊन उत्तम पर्याय कसा निवडायचा, हे विद्यार्थ्यांनी लोकमत आणि व्हीआयटी (व्हेल्लूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी) च्या वतीने आयोजित ‘फ्युचर मंत्रा’ या कार्यक्रमातून जाणले व सर्वच विद्यार्थ्यांना करिअरसंबंधी एक नवा आत्मविश्वास मिळाला़
नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात २ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता झालेल्या ‘फ्युचर मंत्रा’ या कार्यक्रमास विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़यावेळी व्हेल्लूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजीचे अॅसि़ प्रोफेसर डॉ़पुंडलिक रामभाऊ भगत, डॉ़ रणजीत शाही, हर्षदभाई शहा, प्रो़व्ही़डी़ कोनाळे आदी उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली़
‘लोकमत’ नांदेड शाखेचे सहा़ सरव्यवस्थापक विजय पोवार यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्प देवून स्वागत करण्यात आले़ त्यानंतर मोटिव्हेशनल स्पीकर डॉ़रणजीत शाही यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले़
दुसऱ्या सत्रात हर्षदभाई शहा यांनी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे व त्याप्रमाणे अभ्यास करावा व अभियांत्रिकी विषय का निवडावा, अभियांत्रिकीमधील विविध विभागांची माहिती दिली़ तसेच व्हेल्लूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजीचे असि़प्रोफेसर डॉ़पुंडलिक रामभाऊ भगत यांनी विद्यार्थ्यांना चेन्नई, वेल्लोर, भोपाळ आणि आंध्रप्रदेशात असणाºया व्हीआयटीबाबत सविस्तर माहिती दिली़
अद्ययावत ज्ञान देण्याचा व्हीआयटीचा प्रयत्न असतो, असे त्यांनी स्पष्ट केले़ भव्य कॅम्पस, सुसज्ज वर्गखोल्या, कॅम्पस मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीत संधी याविषयी माहिती दिली़ व्हीआयटीच्या उत्कृष्ट शिक्षण पद्धतीमुळे आज अनेक परदेशी विद्यार्थी तेथे शिक्षण घेत असून तुम्हीही करिअर घडविण्यासाठी व्हीआयटीची मदत घ्या, असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले़ यानंतर पालक व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण केले़ शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांमधून लकी ड्रॉ काढून विजेत्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या़
- कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्हाला खरेच मोठे व्हायचे असेल तर तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा
एक म्हणजे जिंकण्याची जिद्द ठेवा, दुसरे तुमचे ध्येय निश्चित करा व तिसरे म्हणजे, स्वत:वर विश्वास ठेवा, कॉन्फिडंट रहा, ओव्हर कॉन्फिडंट नको़
स्पर्धेच्या युगात टिकून रहायचे असेल तर तुम्हाला सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढे राहिले पाहिजे़ यासाठी अगदी सुरुवातीपासून तुमचे ध्येय निश्चित करा, तुमच्या आवडीनिवडी जाणून घ्या, अशा शब्दात रणजीत शाही यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली़