गाडगेबाबा स्मृतीदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:14 AM2020-12-23T04:14:53+5:302020-12-23T04:14:53+5:30
कार लंपास नायगाव - येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरातून ६ डिसेंबर रोजी कार लांबविण्यात आली. प्रकाश पवार यांची ...
कार लंपास
नायगाव - येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरातून ६ डिसेंबर रोजी कार लांबविण्यात आली. प्रकाश पवार यांची ही कार होती. एम.एच.२६-ए.के.९९४४ या क्रमांकाची त्यांनी ही कार उभी करून हेडगेवार चौकात खरेदीसाठी गेले होते. या दरम्यान चोरट्यांनी सदरची कार लंपास केली.
शेतकऱ्याची आत्महत्या
अर्धापूर - तालुक्यातील खैरगाव शिवारात कैलास नांदरे या शेतकऱ्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळाले नाही. या प्रकरणी बालाजी तोरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली.
रत्नाकर ढगे सन्मानित
लोहा - सायाळ येथील युवा शेतकरी रत्नाकर पाटील ढगे यांना ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने दिल्या जाणारा प्रगतीशील शेतकरी शेतीरत्न पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला सदाशिव रणदिवे, संस्थेचे अध्यक्ष रेवणनाथ देशमुख, किरण लोंढे, सुभाष भोसले, दीपक जाधव, प्रा.दिनेश पवार आदी उपस्थित होते.
विवाहितेचा छळ
मुखेड - ऑटो घेण्यासाठी माहेराहून २ लाख रुपये घेवून ये असे म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या आरोपींविरूद्ध मुक्रमाबाद पोलिसांनी गुन्हा नोंदविला. रोशनबी बागवान असे फिर्यादीचे नाव असून जमशीद बागवान, मेहताबसाब बागवान, जमील मेहताबसाब, नजीयाबी सलीम बागवान व हुलपत बागवान आदी पैसे आणण्यासाठी छळ करीत होते असे फिर्यादीने नमुद केले.
विद्युत मोटारीची चोरी
किनवट - किनवट तालुक्यातील आंदबोरी (चि.) येथील शेतावरील विहिरीवर बसवलेली विद्युत मोटार चोरट्यांनी लंपास केली. मोटारीची किंमत १६ हजार रुपये होती. किनवट पोलिसात नैतिक मुंडे यांनी फिर्याद दिली. तपास जमादार पांढरे करीत आहेत.