अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे योग्यरित्या न करणाऱ्या तलाठ्यांवर कायदेशीर कार्यवाही करा : गजानन कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:18 AM2021-02-13T04:18:04+5:302021-02-13T04:18:04+5:30
संबंधित एकदरा गावातील अतिवृष्टी भागातील पाहणी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित महसूल यंत्रणेला योग्य ते पंचनामे ...
संबंधित एकदरा गावातील अतिवृष्टी भागातील पाहणी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित महसूल यंत्रणेला योग्य ते पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे स्पष्टपणे सांगितले होते; परंतु जिल्हाधिकारी यांचे आदेश न मानता मनमानीपणे पंचनामे करणाऱ्या तलाठ्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
तलाठी यांनी स्वत: न हजर राहता बोगस यादी तयार केली व काही नदीकाठच्या शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले असून त्यांचे जमिनीचे क्षेत्रफळ कमी टाकण्यात आले, तर बागायत क्षेत्रात नुकसान कमी झाले असतानाही त्यांचे क्षेत्रफळ जास्त टाकण्यात आले. ही बाब अतिशय गंभीर असून तलाठी सौ. सोलापुरे यांची योग्य ती चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, असेही निवेदनात गजानन कदम यांनी नमूद केले आहे. यावेळी शेतकरी रावसाहेब भोजणे, सुधाकर भोजणे, दिनेश आरसुळे, माधव भोजणे, सीताराम भोजणे आदी उपस्थित होते.