मुखेडमधील जुगार अड्ड्यांवर छापा, २६ हजार रोख जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:41 AM2019-07-10T00:41:56+5:302019-07-10T00:42:41+5:30
उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे यांच्या पथकाने शहरातील एका लॉजवर छापा टाकून ८ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले.
मुखेड : उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे यांच्या पथकाने शहरातील एका लॉजवर छापा टाकून ८ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले. जुगाऱ्यांकडून रोख २६ हजार ४४० रुपये पोलिसांनी जप्त केले.
मुखेड शहरातील गजानन लॉजमधील १०८, १०९ क्रमांकाच्या खोलीवर हे छापे मारण्यात आले. दोन्ही खोलीतून पोलिसांनी किशन विभुते, मधुकर गायकवाड, चंद्रकांत दबडे, गोविंद पवळे, माधव सोनकांबळे, विनोद सोनकांबळे, इम्रान बागवान, व्यंकट सोमवारी, सटवाजी भाडेवाढ, लखन गायकवाड, राम शेळके, गणेश पाटील यांना रंगेहाथ पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविले.
उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे, पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर, पोलीस उपनिरीक्षक असाद शेख, पोकाँ खयुम शेख, किरण सोनकांबळे, अन्वर शेख, मलगीरवार, बाबाराव बंडगर, किरण वाघमारे, शिवाजी आडबे यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ पांडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
देगलूर येथेही नरंगल रस्त्यावर मोहम्मद जाकेर अहेमद गौस यांच्या जागेत तिर्रट नावाचा जुगार खेळणाºयांना पोलिसांनी अटक केली, त्यांच्याकडून ७२ हजार ४०० रुपयांचा लंपास केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी दिलेल्या तक्रारीवरुन देगलूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ बोंबले हे करीत आहेत.