रुग्णांच्या जीविताशी खेळ
By admin | Published: October 22, 2014 01:18 PM2014-10-22T13:18:34+5:302014-10-22T13:18:34+5:30
सरकारी दवाखान्याची नेहमीच चर्चा होते. तेथील डॉक्टरांशी संगनमत करून खाजगी डॉक्टरांनी आरोग्य विभागाचे सर्व नियम गुंडाळून रुग्णांना लुटण्याचा व्यापारच सुरू केल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र आहे.
Next
हदगाव : सरकारी दवाखान्याची नेहमीच चर्चा होते. तेथील डॉक्टरांशी संगनमत करून खाजगी डॉक्टरांनी आरोग्य विभागाचे सर्व नियम गुंडाळून रुग्णांना लुटण्याचा व्यापारच सुरू केल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र आहे.
शहरातील मोठमोठे दवाखाने त्यांच्या अद्ययावत यंत्रसामुग्री तेथील चमचम पाहून खेड्यातील रुग्ण त्या दवाखान्यात जाण्याचे टाळतो. अति जीवावर बेतले तेव्हाच नाईलाजास्तव रुग्णाला नातेवाईक खाजगी दवाखान्यात दाखल करतात. त्याला कधी-कधी जीव गमवावा लागतो. तर कधीकधी जीव तर वाचतो परंतु झालेल्या खर्चाच्या हिशोबात एक प्रकारे त्याचा मृत्यूच होतो.
मुतखडा, मुळव्याध, दमा, अँपेडीक्स आदी असाध्य रोगावर ही मंडळी काम करतात. रुग्णाला रोगापेक्षा उपचारच भयानक वाटायला लागला. मोठमोठय़ा इमारती व बोर्डामुळे अज्ञात ग्रामस्थांच्या जाळ्यात अटकतात. रुग्णाला अँडमिट करण्यासाठी खाटांचीही व्यवस्था या दवाखान्यात करण्यात आलेली आहे. परंतु शासन नियमाप्रमाणे या दवाखान्यात नर्स, कंपाऊंडर असायला पाहिजे. त्याचप्रमाणे पिण्यासाठी शुद्धपाणी व शौचालयाची आवश्यक असते. परंतु या सुविधाचा येथे अभाव आहे.मनाठा, तामसा, निवघा, बामणीफाटा आदी ठिकाणी डॉक्टरांनी आपले बस्तान मांडले आहे. याशिवाय जिल्ह्यावरून येणार्या वेगवेगळ्या कंपन्यांचे औषध विक्रेत्याकडून ही मंडळी मोठय़ा प्रमाणात औषधी विक्रेत्याकडून ही मंडळी मोठय़ा प्रमाणात औषधी खरेदी करून ग्राहकाच्या माथी मारतात व नफा कमावतात. बाळंतपण ही मंडळी बिनधास्त करतात. एखादा सर्जन जेवढी काळजी औषधीच्या कंपनीविषयी व रुग्णांविषयी घेतो ती काळजी हे डॉक्टर घेत नाहीत किंवा त्यांना कळत नाही. याशिवाय खेड्यातील औषधी दुकान शहरातील औषधी दुकानांची परवाने असतात. एकाच्या नावावर किंवा किरायाने घेतलेली व चालवितात कुटुंबातील १0 वी, १२ वी नापास झालेली नातेवाईक मंडळी. यामुळे रुगणांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. औषधांच्या तारखा संपलेल्या औषधीही या दुकानात मिळतात. घाईमध्ये किंवा अज्ञानामुळे कालबाह्य झालेली औषधी ग्राहकाला दिली जातात. त्याच्या परिणामाची चिंता न करता घटना घडल्यानंतर राजकीय दबाव व आर्थिक तडजोड करून प्रकरण मॅनेज केले जाते.
डॉक्टरासोबत शाळा सोडलेली गरीब कुटुंबातील लहान मुले कंपाऊंडरचे काम करतात. पिण्याचे पाणी दवाखान्याबाहेर हात धुण्यासाठी ठेवलेल्या भांडे दिसावे अशा प्रकारे ठेवलेले असते.
शौचालय, लघुशका तर नातेवाईकासह रुग्णालाही उघड्यावर कराव्या लागतात. या दवाखान्याची तपासणी, औषधी दुकानाची तपासणी करणे तीन महिन्याला अनिवार्य असतानाही याकडे कानाडोळा केला जाते. यामुळे रुग्णांची दिवसेंदिवस आर्थिक लुट तर होतेच याशिवाय चुकीच्या व पॉवरच्या औषधीमुळे आरोग्याचीही हानी होते. याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
---------
■ शहरातील हे लोण आता खेड्यापाड्यातही पोहचले आहे. श्रीमंत कुटुंबातील बर्यापैकी बुद्धांक असलेली मुलंमुली मुंबई, दिल्ली, कर्नाटक आदी ठिकाणाहून खेड्यातून न कळणार्या डिग्रीचे मोठमोठे फलक लावत आहेत. ग्राहकांना लुभावत पैशाची कमतरता नसल्यामुळे मोक्याच्या जागा मिळवून टोलेजंग इमारती बांधून रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लुट करीत आहेत. शहरात प्रत्येक रोगाचे विशेषज्ञ मिळतात. त्यांच्या बोर्डाव्यतिरिक्त इतर रोगावर ते इलाज करीत नाहीत. (उदा. त्वचारोग, नेत्ररोग, स्त्रीरोग) वगैरे परंतु तालुकास्तरावर एक डॉक्टर सर्वच रोगाचा तज्ज्ञ असतो.