सुशिक्षित तरुणांना गंडविणारी टोळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:35+5:302021-06-22T04:13:35+5:30

पंढीत ढवळे यांनी वसमत पोलीस ठाण्यात १३ मे २०२१ रोजी संतोष बनवारीलाल सरोज, रा. बाडेपूर, जि. जोनपूर याच्या विरोधात ...

Gang arrested for harassing educated youth | सुशिक्षित तरुणांना गंडविणारी टोळी अटकेत

सुशिक्षित तरुणांना गंडविणारी टोळी अटकेत

Next

पंढीत ढवळे यांनी वसमत पोलीस ठाण्यात १३ मे २०२१ रोजी संतोष बनवारीलाल सरोज, रा. बाडेपूर, जि. जोनपूर याच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यात ढवळे यांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवीत सरोज याने दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे नमूद केले होते, तसेच आरोपींनी अशाच प्रकारे अनेकांना गंडविल्याचेही ढवळे यांनी पोलिसांना सांगितले. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर अधीक्षक यशवंत काळे, पोलीस उपाधीक्षक यतीश देशमुख यांनी दोन पथके तयार केली. स्थागुशाचे पोउपनि शिवसांब घेवारे, पोशि. किशाेर कातकडे, विठ्ठल काळे, जयप्रकाश झाडे व वसमतचे सपोनि बोधनापोड, संदीप चव्हाण, रवी ठेंबरे, विवेक गुंडरे, बालाजी वडगावे यांचा त्यात समावेश हाेता. पोलिसांनी ९ जून रोजी नांदेड रेल्वेस्टेशन परिसरातून रवींद्र दयानिधी संकुवा, रा.ओडिशा, ॲड. नरेंद्र विष्णुदेव प्रसाद रा. लयरोपरुवार, मध्यप्रदेश यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत या प्रकरणाची व्याप्ती देशभरात असल्याचे लक्षात आले. आरोपींनी नांदेड, मुंबई, दिल्ली व लखनौ यासह अनेक ठिकाणी तरुणांना बोगस नियुक्तीपत्रे दिली होती. सायबर सेलच्या माध्यमातून ११ जून रोजी नांदेड शहरातून सतीश तुळशीराम हंकारे, रा.बोरगाव, ता.लोहा, आनंद पांडुरंग कांबळे, रा.अहमदपूर यांना अटक केली. हे दोन्ही आरोपी नांदेडला पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून बेरोजगारांना हेरत होते. १३ जून रोजी पोलिसांनी मुंबई येथून गौतम एकनाथ फणसे याला अटक केली. त्याने मुंबईत अनेकांना गंडविल्याची कबुली दिली. दिल्ली येथून अभय मेघ:श्याम रेडकर याला पकडले. त्याच्याकडून संतोष कुमार सरोजची माहिती मिळाली. लखनौ येथे लपून बसलेल्या सरोजला एका लॉजमधून अटक केली. त्याच्याकडून मंत्रालयातील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नावे बनावट स्टॅम्प, नियुक्तीपत्र, भारत सरकार व उत्तर प्रदेश सरकार यांची नावे असलेले लिफाफे, बनावट ओळखपत्र यासह इतर साहित्य मिळाले. पोलिसांनी आरोपींची १८ बँक खाती सील केली आहेत. नगदी ५६ हजार, कार, सात मोबाइल, असा एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दहा वर्षांपासून चालवीत होते रॅकेट

आरोपी हे गेल्या दहा वर्षांपासून हे रॅकेट चालवीत होते. महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पश्चिम बंगाल यासह इतर राज्यांतील बेरोजगार तरुणांची त्यांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.

Web Title: Gang arrested for harassing educated youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.