नांदेडमधील गँग वॉर ; विक्की चव्हाण खून प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 12:40 PM2020-10-22T12:40:03+5:302020-10-22T12:43:50+5:30

Gang War in Nanded : विक्की चव्हाण आणि कैलास बिघानिया हे दोन युवक ‘दादा’ झाले आणि मग मी मोठा की तू मोठा असा वाद सुरु झाला.

Gang War in Nanded; the main accused arrested in the Vicky Chavan murder case | नांदेडमधील गँग वॉर ; विक्की चव्हाण खून प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

नांदेडमधील गँग वॉर ; विक्की चव्हाण खून प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

Next
ठळक मुद्देविक्की चव्हाण खून प्रकरणातील तीन गुन्हेगार सध्या पोलीस कोठडीत आहेत.

नांदेड- कुख्यात गुन्हेगार विक्की चव्हाणचा टोळी युद्धातून बिगानिया गॅंग ने अत्यंत निर्दयीपणे खून केला होता. या प्रकरणात बिगानिया टोळीचे इतर साथीदार अगोदरच पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानंतर 21 ऑक्टोबर च्या रात्री मुख्य आरोपी कैलास बिघानियासह साथीदार दिलीप डाखोरे आणि तिसरा अश्या तीन जणांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

विक्की चव्हाण खून प्रकरणातील तीन गुन्हेगार सध्या पोलीस कोठडीत आहेत. टोळी युद्धातील सर्व धागे दोरे आता शोधून काढणे सोपे जाणार आहे. या तिघांना पकडतांना एका पोलिसाला दुचाकींचा धक्का देऊन गुन्हेगारांनी खाली पाडले होते. त्यानंतर सुद्धा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने तीन जणांना पकडले आहे. आता वेगवेगळ्या भूमिका विक्की चव्हाणच्या खून प्रकरणात पार पाडणाऱ्या गुन्हेगारांची संख्या 12 झाली आहे. 

विक्की चव्हाण आणि कैलास बिघानिया हे दोन युवक ‘दादा’ झाले आणि मग मी मोठा की तू मोठा असा वाद सुरु झाला. या दोघांच्याही टोळीत अल्पवयीन मुलांचा भरणा होता. यातून एकमेकांच्या टोळीवर हल्ले करण्यात येत होते. 4 ऑगस्ट रोजी विक्की चव्हाणचा खून करून आपली दहशत पसरवण्यात कैलाशला यश आले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात अनेकांना अटक केली. आता मुख्य आरोपी बिगानिया पोलिसांच्या हाती लागला आहे. पहिल्यांदा न्यायालयात आरोपी म्हणून कैलाशला पोलिसांनी आणले होते. तेव्हा त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून पाळण्याचा प्रयत्न केला होता.

Web Title: Gang War in Nanded; the main accused arrested in the Vicky Chavan murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.