जिल्ह्यात लाखावर गॅस ग्राहक सबसिडीविना
By admin | Published: January 28, 2015 02:05 PM2015-01-28T14:05:28+5:302015-01-28T14:05:28+5:30
घरगुती गॅस सिलिंडरसाठीच्या पहल या प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजनेत जिल्ह्यातील १ लाख ६0 हजार ७७३ ग्राहकांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात अजूनही १ लाख ४ हजार २५७ ग्राहक सबसिडीविनाच आहेत.
नांदेड : घरगुती गॅस सिलिंडरसाठीच्या पहल या प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजनेत जिल्ह्यातील १ लाख ६0 हजार ७७३ ग्राहकांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात अजूनही १ लाख ४ हजार २५७ ग्राहक सबसिडीविनाच आहेत.
जिल्ह्यात २ लाख ६५ हजार ३0 गॅसग्राहक आहेत. जिल्ह्यात १ जानेवारी २0१५ पासून पहल अर्थात प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.
पहल योजनेअंतर्गत गॅस सबसिडी मिळविण्यासाठी आता आधार क्रमांक बंधनकारक नाही. ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही त्यांनी गॅस वितरण करणार्या कर्मचार्याकडे केवळ बँकेचे पासबुक आणि गॅस कार्डची झेरॉक्स द्यावी लागणार आहे. त्याआधार त्यांचे बँक खाते गॅस ग्राहक क्रमांकाशी संलग्न करण्यात येवून ते अनुदानासाठी पात्र ठरणार आहे.
आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक गॅस क्रमांकाशी संलग्न न केलेल्या सर्व गॅस धारकांनी विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे अनुदान बँक खात्यावर प्राप्त करण्यासाठी उपरोक्त कागदपत्र जमा करावीत अन्यथा गॅस अनुदानापासून वंचित रहावे लागेल, असा इशारा जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आला आहे. /(प्रतिनिधी)