गॅस सिलेंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढले; आता मोजा ८८५ रुपये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:23 AM2021-08-20T04:23:07+5:302021-08-20T04:23:07+5:30

कधीकाळी ३५० रुपये किंमत असलेला स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर आता ८८५ रुपयांना विकत घ्यावा लागत आहे. आठ महिन्यातच तब्बल १६५ ...

Gas cylinder rises by Rs 25 again; Now count Rs 885! | गॅस सिलेंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढले; आता मोजा ८८५ रुपये !

गॅस सिलेंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढले; आता मोजा ८८५ रुपये !

Next

कधीकाळी ३५० रुपये किंमत असलेला स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर आता ८८५ रुपयांना विकत घ्यावा लागत आहे. आठ महिन्यातच तब्बल १६५ रुपयांची दरवाढ झाली आहे. परिणामी सामान्य नागरिक या दरवाढीने मेटाकुटीस आला आहे. घराचे बजेट सांभाळताना गृहिणींनाही कसरत करावी लागत आहे. गॅस दरवाढ कमी करण्याची सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने सिलेंडरवरील सबसिडीही बंद केली आहे.

सबसिडी बंद,

दरवाढ सुरूच

n गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी गेल्या वर्षभरापासून सरकारने बंद केली आहे.

n जवळपास २५० रुपये मिळणारी सबसिडी कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिक संतप्त झाला आहे. सबसिडी नाही तर नाही दरवाढ तरी थांबवा, अशी मागणी होत आहे.

छोटे सिलेंडरचे दर जैसे थे

n स्वयंपाकासाठी लागणाऱ्याच गॅसची दरवाढ केंद्र सरकार दर महिन्याला करत आहे.

n इतर बाबींसाठी वापरण्यात येणाऱ्या छोट्या सिलेंडरमध्ये मात्र कोणतीही दरवाढ झाली नाही.

n सामान्य नागरिकांच्या खिशाला हात घालण्याचे धोरण सरकारचे असल्याची टीकाही होत आहे.

Web Title: Gas cylinder rises by Rs 25 again; Now count Rs 885!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.