गॅस सिलिंडरची आठ महिन्यांत २९३ रुपयांची दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:55 AM2018-11-21T00:55:36+5:302018-11-21T00:57:39+5:30

गेल्या आठ महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २९३ रुपयांची वाढ झाली असल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले़ त्यातच अनुदान घेणाऱ्या ग्राहकांचे अनुदानही बँक खात्यात जमा होत नसल्याने ‘अच्छे दिन’चे स्वप्न पाहणाºयांचा हिरमोड झाला आहे़ गेल्या आठ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या दरांचा आढावा घेत गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २९३ रुपयांची घवघशीत वाढ झाल्याने नोव्हेंबर महिन्यात अनुदानित सिलिंडर ४.९५ रुपयांनी तर विनाअनुदानित सिलिंडर २९३ रुपयांनी महागले आहे़ आता विनाअनुदानित सिलिंडरसाठी ९९३ रूपये मोजावे लागत आहेत.

Gas cylinders cost Rs 293 in eight months | गॅस सिलिंडरची आठ महिन्यांत २९३ रुपयांची दरवाढ

गॅस सिलिंडरची आठ महिन्यांत २९३ रुपयांची दरवाढ

Next
ठळक मुद्दे महागाईचा भडकास्वयंपाकघराचे गणित कोलमडले

नितेश बनसोडे ।
श्रीक्षेत्र माहूर : दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने विनाअनुदानित सिलिंडरवर कंबरमोड भाववाढ करून जनतेला दिवाळीत महागाईची गिफ्ट दिली. घरगुती वापराचा गॅस सिलिंडर आता ५१४.५८ रूपयाला पडत आहे. अनेक ग्राहकांनी सबसिडी सोडत असल्याचे मेसेज केलेले नाहीत़ असे असतानाही सबसिडी त्याच्या बँक खात्यात जमा होत नसल्याने ते पण विनाअनुदानितच्याच यादीत जाऊन बसले आहेत़ अनुदान न सोडणाºयांसह अनुदान सोडणाºया ग्राहकांना आता गॅस सिलिंडर सरसकट ९९३ ला पडत आहे. आठ महिन्यांत गॅस सिलिंडर २९३ रुपयाने महाग झालेले दिसून येत असून या दरवाढीने ग्राहकांतून कमालीचा संताप व्यक्त केल्या जात आहे.
आणखी दरवाढीची शक्यता
विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने होणाºया दरवाढीविरुद्ध विरोधी पक्षातर्फे केवळ नामधारी आंदोलन उभारले जात आहे़ नागरिकांना मात्र ‘सगळा गाव मामाचा अन् एकही नाही कामाचा’ चीच प्रचिती येत आहे.
डिसेंबरमध्ये एक हजारच्या पलीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलाढाल लक्षात घेता येत्या डिसेंबर महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरचे भाव एक हजारच्या वर जाणार असल्याचे संकेत आहेत.डीलरचे कमिशन वाढविण्यासाठी केंद्राने नोव्हेंबरमध्ये दोनदा गॅस सिलिंडरच्या भावात वाढ केली आहे १ नोव्हेंबर रोजी २.९४ पैशांनी वाढ करून २ नोव्हेंबर रोजी डीलर्सचे कमिशन वाढविले़ हा भार सर्वसामान्य ग्राहकांच्या माथी मारून हे सरकार सर्वसामान्यांच्या नव्हे, तर भांडवलदारांच्या हितासाठी काम करत असल्याचे सिद्ध होत असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांतून व्यक्त होत आहेत.
आधी पैसा खर्च
आंतरराष्ट्रीय बाजारानुसार देशांतर्गत गॅस सिलिंडरची दरवाढ निश्चित होत असते़ सातत्याने होत असलेल्या दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान उशिराने बँक खात्यात येत असून लोकांच्या खिशातून आधी पैसा खर्च होतो. त्यानंतरही पैसे मिळत नाहीत़
टाळाटाळ
याशिवाय अनेक ग्राहकांनी गॅस सिलिंडरचे अनुदान सोडत असल्याचे संदेश केलेले नसतानाही सुरुवातीला नियमितपणे बँक खात्यात जमा होत असलेले अनुदान सुद्धा अनेक ग्राहकांना मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. ग्राहक याबाबत गॅस एजन्सीकडे विचारले असता ते बँकेत जाऊन विचारा, असे सांगत आहेत.
महागाईचा आलेख
सत्ताधारी पक्षाचे गल्लीतील कार्यकर्ते मात्र उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून घराघरांत गॅस सिलिंडर पोहोचले असल्याच्या टिमक्या मारत आहेत़ मात्र दरवाढीचा हा आलेख दिवसेंदिवस वाढतच असल्याने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.

Web Title: Gas cylinders cost Rs 293 in eight months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.