नांदेडमध्ये विष्णुपुरीसह दोन बंधाऱ्याचे दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 11:22 IST2020-07-25T11:21:58+5:302020-07-25T11:22:29+5:30
नांदेड, मुदखेड आणि नायगाव तहसील प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नांदेडमध्ये विष्णुपुरीसह दोन बंधाऱ्याचे दरवाजे उघडले
नांदेड : विष्णुपूरी प्रकल्प क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसाने विष्णुपूरी प्रकल्प तुडुंब भरला आहे. प्रकल्पात पाण्याची आवक सुरुच असल्याने शनिवारी सकाळी 9.30 वाजता 1 दरवाजा पुन्हा उघडण्यात आला.
गोदापात्र दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या खालच्या बाजूला असलेल्या आमदुरा बंधाऱ्याचे दोन आणि बळेगाव बंधाऱ्याचेही दोन दरवाजे अनुक्रमे सकाळी 10 आणि 11 वाजता उघडण्यात आले.
गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
नांदेड, मुदखेड आणि नायगाव तहसील प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या तीनही तालुक्यात गोदकाठी विटभट्टी कारखाने आहेत. गोदापात्रात सोडलेल्या पाण्यामुळे कोणतीही हानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.