आता घरातून काढा लर्निंग लायसन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:13 AM2021-06-11T04:13:23+5:302021-06-11T04:13:23+5:30
एजंटांचा रोजगार बुडाला - कोरोना महामारीमुळे आरटीओ कार्यालयातील वाहनधारकांचे वाहन ट्रान्स्फरचे काम बंद आहे. शिवाय ऑनलाईन प्रक्रिया सुरू ...
एजंटांचा रोजगार बुडाला
- कोरोना महामारीमुळे आरटीओ कार्यालयातील वाहनधारकांचे वाहन ट्रान्स्फरचे काम बंद आहे. शिवाय ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्याने एजंटाचे काम कमी झाले आहे. आता अनलॉक झाल्यानंतर वाहन ट्रान्स्फरचे काम सुरू झाल्यावर एजंटांना काम मिळण्याची शक्यता आहे. कोरोना काळात अनेक एजंटांचा रोजगार बुडाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.
परवान्यांचा काेटा
- शिकाऊ तसेच कायमस्वरूपी परवान्याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला एक दिवसाला विशिष्ट कोटा दिला आहे. यात दुचाकी व चारचाकी वाहन परवान्यांसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली जात आहे. आवश्यक दस्तावेज संकेतस्थळावर अपलोड करावे लागतात.
- वाहनांची नोंदणी
लॉकडाऊन हटविण्यात आल्यानंतर सोमवारपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन वाहनांची नोंदणी सुरू झाली आहे. आता खरेदी प्रक्रिया सुरू झाल्याने येत्या काही दिवसांत वाहन नाेंदणीचे प्रमाण वाढणार आहे.