अंगणवाडीचा निधी मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 01:09 AM2019-05-08T01:09:48+5:302019-05-08T01:10:27+5:30
तालुक्यातील बाबूळगाव येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व म.बा.वि. विभागअंतर्गत गावच्या सरपंचांनी स्लॅबपर्यंतचे काम स्वखर्चाने बांधले, मात्र, पंचायत समितीने त्यांना अद्याप छदामही दिला नसल्याने संतप्त सरपंचांनी आता उपोषणाची तयारी सुरु केली आहे.
धर्माबाद : तालुक्यातील बाबूळगाव येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व म.बा.वि. विभागअंतर्गत गावच्या सरपंचांनी स्लॅबपर्यंतचे काम स्वखर्चाने बांधले, मात्र, पंचायत समितीने त्यांना अद्याप छदामही दिला नसल्याने संतप्त सरपंचांनी आता उपोषणाची तयारी सुरु केली आहे.
बाबूळगाव येथील ग्रामपंचायतमध्ये अंगणवाडी बांधकाम इमारतीसाठी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पाच लाख व म.बा.वि. विभागांतर्गत दोन लाख रुपये अशा एकूण सात लाख रुपयांच्या निधीस ७ मार्च २०१८ रोजी मंजुरी मिळाली. तर बांधकाम करण्यास तांत्रिक मान्यता ४ सप्टेंबर २०१८ रोजी व प्रशासकीय मंजुरी ३ आॅक्टोबर २०१८ रोजी मिळाली. याउपरही सरपंच ललिताबाई मारोतराव मोरे यांनी स्वत:चे साडेतीन ते चार लाख रुपये खर्चून इमारतीचे बांधकाम स्लॅबपर्यंत पूर्ण केले. पुढील बांधकाम करण्यास पैसा नसल्याने काम थांबले असून बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन करून द्या, अशी मागणी सरपंचांनी पत्राद्वारे तीन वेळेस गटविकास अधिकारी यांच्याकडे केली. तरीही गटविकास अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप मोरे यांनी केला.
धर्माबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जाधव यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली़ यापूर्वीचे गटविकास अधिकारी नारवटकर यांनीही पाहणी केली़ तरीही निधी मिळाला नाही. सदरील कामाच्या निधीची मागणी पंचायत समितीने वरिष्ठांकडे केली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दुसरीकडे, बाबूळगाव येथीलच गंगाधर लक्ष्मण मोरे व लक्ष्मण मारोती गादगे यांनी स्वखर्चाने शौचालय बांधून एक वर्ष झाले तरीही त्यांना पं.स.कडून निधी मिळाला नाही. बाबूळगाव येथील ग्रामसेवक व एपीओ यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप केला जात आहे.
बीडीओंनी दोन वेळा केली पाहणी
धर्माबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जाधव यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली़ यापूर्वीचे गटविकास अधिकारी नारवटकर यांनीही पाहणी केली़ तरीही निधी मिळाला नाही. सदरील कामाच्या निधीची मागणी पंचायत समितीने वरिष्ठांकडे केली नसल्याची माहिती सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
दुसरीकडे बाबूळगाव येथीलच गंगाधर लक्ष्मण मोरे व लक्ष्मण मारोती गादगे यांनी स्वखर्चाने शौचालय बांधून एक वर्ष झाले तरीही त्यांना पं.स.कडून निधी मिळाला नाही.
४बाबूळगाव येथील ग्रामसेवक व एपीओ यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप केला जात आहे.