पाणीटंचाई आराखड्याला मंजुरी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:41 AM2019-01-31T00:41:06+5:302019-01-31T00:43:04+5:30

तालुक्यावर यावर्षी पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहण्याची शक्यता असून जानेवारी ते मार्च या कालावधीत १६ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे़ संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीने ४ कोटी ५ लक्ष रुपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे़ मात्र महिना लोटूनही आराखड्याला मंजुरी देण्यात आली नाही़ त्यामुळे पाणी टंचाईचे संकट ओढवल्यावर मंजुरी मिळेल का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे़

Getting water clearance clearance | पाणीटंचाई आराखड्याला मंजुरी मिळेना

पाणीटंचाई आराखड्याला मंजुरी मिळेना

Next
ठळक मुद्देकिनवट तालुका : १६ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज४ कोटी ५ लाख रूपयांचा पाणीटंचाई आराखडा कागदावरच

किनवट : तालुक्यावर यावर्षी पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहण्याची शक्यता असून जानेवारी ते मार्च या कालावधीत १६ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे़ संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीने ४ कोटी ५ लक्ष रुपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे़ मात्र महिना लोटूनही आराखड्याला मंजुरी देण्यात आली नाही़ त्यामुळे पाणी टंचाईचे संकट ओढवल्यावर मंजुरी मिळेल का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे़
किनवट या डोंगराळ अतिदुर्गम तालुक्यात १९१ गावे, १०५ वाडी-तांडे असून पंचायत समितीअंतर्गत १३४ ग्रामपंचायती कार्यान्वित आहेत़ २०१८ च्या पावसाळ्यात किनवट तालुक्यात केवळ ६६ टक्के इतकाच पाऊस झाला आहे़ त्यातही हा पाऊस धरसोड पद्धतीने झाल्याने नदी- नाले म्हणावे तसे भरून वाहिले नाही़ एवढेच नाहीतर भूगर्भातील पाणीपातळी म्हणावी तशी वाढली नाही़ तालुक्यातील छोटे-मोठे नाले नोव्हेंबरच्या शेवटी पार कोरडेठाक पडले़ परिणामी नोव्हेंबरमध्येच पैनगंगा नदी व नाले आटले. प्रकल्पातील जसलसाठाही घटू लागला आहे़ ऊन, थंडी अशा वातावरणात जानेवारी महिन्यातच पाणीटंचाई निर्माण होणार आहे, असे सध्य चित्र आहे़ इस्लापूर भागात तर पन्नास टक्क्यांपेक्षा पाऊस कमी पडल्याने मे अखेर या भागात काय परिस्थिती राहील हे काळच सांगेल़
जानेवारी ते मार्च या महिन्यात संभाव्य पाणीटंचाईची शक्यता पाहता किनवट पंचायत समितीच्या वतीने ४ कोटी ५ लक्ष ४६ हजारांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे महिनाभरपूर्वी पाठविला आहे़ मात्र अद्यापही आराखड्याला मंजुरी मिळाली नाही़
जगदंबा तांडा, प्रेमनगर, दिगडी (मं), जवरला, मोहाडा, मोहपूरखेडी, पळशी, परशरामनाईक तांडा, राजगड, राजगडखेडी, भामपूर, रिठा, बुरकुलवाडी, शिवणी (ई) व नदी काठावरील धानोरा (सी) आणि गेल्या कित्येक वर्षांपासून टँकरग्रस्त असलेल्या मारेंगाव (वरचे) अशी सोळा गावे, वस्त्या टँकरग्रस्त असल्याने आराखड्यात प्रस्तावित असून २७ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे़ जगदंबातांडा, मानसिंगनाईक तांडा, व्यंकटापूर तांडा, भीलगाव, डुंड्रा, लकडकोट, निराळातांडा ही गावे पूरक नळयोजनेसाठी प्रस्तावित असून ३५ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे़ ४२ गावांत नळयोजनेची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून १ कोटी ३६ लक्ष ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे़ २४२ नवीन विंधन विहीर घेणे प्रस्तावित असून १ कोटी ४३ लक्ष ७६ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे़ विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती ५२ ठिकाणी प्रस्तावित आहे़ त्यासाठी ६ लाख २४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे़ ९० ठिकाणी विहीर, बोअर अधिग्रहण करणे प्रस्तावित असून १५ लक्ष ९६ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे़ विहीर खोल करणे व गाळ काढणे यासाठी ४१ कामे प्रस्तावित असून ४१ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे़ दरम्यान, टंचाई निर्माण झालेल्या गावांत प्रशासनाने वेळीच उपाययोजना राबवून टंचाईवर मात करावी. टंचाईच्या बाबतीत दुर्लक्षितपणा खपवून घेतला जाणार नाही, संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, अशा सूचना आ़प्रदीप नाईक यांनी प्रशासनाला दिल्या आहेत़ येत्या काळात टंचाईची काय परिस्थिती राहते ते लवकर समजेल. वेळीच प्रस्तावित आराखड्याला मंजुरी मिळाली तर उपाययोजना वेळीच राबविणे सोयीचे होईल, हे तितकेच खरे़
संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी सूचना
गेल्या कित्येक वर्षांत जानेवारी ते मार्च या कालावधीत पहिल्यांदाच चार कोटी रुपयांचा आराखडा उपाययोजना राबविण्यासाठी पंचायत समितीने तयार केला आहे़ तर आठ-नऊ वर्षांत टँकरग्रस्त गावांचा पहिल्यांदाच आकडा वाढल्याचे हाती आलेल्या टंचाई आराखड्यावरून दिसून येत आहे़ वेगवेगळ्या ४९० कामांची संख्या तीन महिन्यांच्या कालावधीत आहे़ मात्र वेळीच उपाययोजना राबविण्यासाठी आराखड्याला मंजुरी देण्यात आली नसल्याने टंचाईची तीव्रता वाढल्यावर मंजुरी मिळेल का असा सवाल विचारला जात आहे़ दरम्यान, टंचाई निर्माण झालेल्या गावांत प्रशासनाने वेळीच उपाययोजना राबवून टंचाईवर मात करावी़ टंचाईच्या बाबतीत दुर्लक्षितपणा खपवून घेतला जाणार नाही़ संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचना आ़ प्रदीप नाईक यांनी प्रशासनाला दिल्या आहेत़
कोटी ४३ लक्ष ७६ हजार रूपये खर्च अपेक्षित

  • जगदंबा तांडा, मानसिंगनाईक तांडा, व्यंकटापूर तांडा, भीलगाव, डुंड्रा, लकडकोट, निराळातांडा ही गावे पूरक नळयोजनेसाठी प्रस्तावित असून ३५ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे़ ४२ गावांत नळयोजनेची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून १ कोटी ३६ लक्ष ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे़ २४२ नवीन विंधन विहीर घेणे प्रस्तावित असून १ कोटी ४३ लक्ष ७६ हजार रूपये खर्च अपेक्षित आहे़
  • जानेवारी ते मार्च या महिन्यात संभाव्य पाणीटंचाईची शक्यता पाहता किनवट पंचायत समितीच्या वतीने ४ कोटी ५ लक्ष ४६ हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे महिनाभरपूर्वी पाठविला आहे़ मात्र अद्यापही आराखड्याला मंजुरी मिळाली नाही़
  • किनवट या डोंगराळ अतिदुर्गम तालुक्यात १९१ गावे, १०५ वाडी- तांडे असून पंचायत समितीअंतर्गत १३४ ग्रामपंचायती कार्यान्वित आहेत़ २०१८ च्या पावसाळ्यात किनवट तालुक्यात केवळ ६६ टक्के इतकाच पाऊस झाला आहे़

Web Title: Getting water clearance clearance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.