नांदेडमध्ये २७ फेब्रुवारीला गझलकार इलाही जमादार अभिवादन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:24 AM2021-02-26T04:24:25+5:302021-02-26T04:24:25+5:30
मराठी, हिंदी आणि उर्दू भाषेत दर्जेदार गझल लेखन करणारे कवीश्रेष्ठ इलाही जमादार यांचे गेल्या ३१ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन ...
मराठी, हिंदी आणि उर्दू भाषेत दर्जेदार गझल लेखन करणारे कवीश्रेष्ठ इलाही जमादार यांचे गेल्या ३१ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. नांदेडकरांच्यावतीने या कार्यक्रमात इलाही जमादार यांच्या गझल, गायन, वाचन आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणा-या मनोगतांमधून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मंत्रालयातील अवर सचिव विकास तू. कदम, गझलकार व्यंकटेश कुलकर्णी (हैद्बाराद), गझलकार विमल मुदाळे (लातूर), डॉ. अरुण साबळे (शिर्डी), मेगेश रूपटक्के (पुणे), अशोक डोंगरे (माजलगाव) या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अभिवादन कार्यक्रमात नांदेड शहरातील गायक, कलावंत इलाही जमादार यांच्या विविध रचना सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी कवीश्रेष्ठ इलाही जमादार स्मृती समारोह समितीचे प्रा. विकास कदम, प्राचार्य डाॅ. शेखर घुंगरवार, डॉ. राजेंद्र गोणारकर, माया भद्रे, बापू दासरी सदाशिव गच्चे, ॲड. साहेबराव शेळके, राम चव्हाण, बी. के. कांबळे, रोहित शास्त्री अडकटलवार, अरुण फाजगे, दीपक नरवाडे, डॉ. कैलास धुळे, प्रवीण खंदारे, प्रा. जगदीश केंद्रे, नागराज मांजरमकर, इंजि. सम्राट हटकर, मानव कुंडलवाडीकर, शंकर नरवाडे, मिलिंद ढवळे, बाबूराव पाटील, यशवंत कदम, लक्ष्मी लहाने, अविनाश नाईक, नामदेव इंगळे, अविनाश भुताळे, डॉ. राजेंद्र लोणे आदींनी पुढाकार घेतला आहे.